मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

K-pop star Sowon : पुतळ्यासोबत काढलेल्या फोटोमुळं गायिका ट्रोल, डिलीट करावी लागली पोस्ट

K-pop star Sowon : पुतळ्यासोबत काढलेल्या फोटोमुळं गायिका ट्रोल, डिलीट करावी लागली पोस्ट

दक्षिण कोरियाच्या के पॉप गर्ल ग्रुप जीफ्रेंडची गायिकी सोवॉन (K-pop star Sowon ) सध्या सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. कारण नाझी युनिफॉर्म घातलेल्या एका पुतळ्यासोबत दिलेल्या पोजमुळे लोकांनी तिच्यावर निशाणा साधला आहे.

  • Published by:  Kiran Pharate
सियोल 1 फेब्रुवारी : दक्षिण कोरियाच्या के पॉप गर्ल ग्रुप जीफ्रेंडची गायिकी सोवॉन (K-pop star Sowon ) सध्या सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. कारण तिनं नाझी युनिफॉर्म घातलेल्या एका पुतळ्यासोबत पोज देत काही फोटो (posting photo with nazi) पोस्ट केले. काही वेळातच तिनं आपली ही इन्स्टाग्राम पोस्ट डिलीट केली. किम सो जंग असं नाव असलेल्या या गायिकेनं ऐतिहासिक जर्मन मिलिटरीचा युनिफॉर्म घातलेल्या एका पुतळ्यासोबत आपले 2 फोटो शेअर केले. हे फोटो गीफ्रेंड्सच्या आगामी वालपुरर्गीस नाईट या अल्बमच्या सेटवरील असल्याचं म्हटलं जातं आहे. सोवॉननं या पोस्टबद्दल काहीही न बोलता ती सोशल मीडियावरुन डिलीट केली. यावर दिलेल्या प्रतिक्रियेवर म्युझिक इंडस्ट्रीतील सूत्रांनी सांगितलं, की ते या घटनेचा तपास करत आहेत. जीफ्रेंडच्या चाहत्यांकडून अशी मागणी होत आहे, की गायिकेनं या फोटोंसाठी माफी मागावी. याच मागणीसाठी तिचं नावं सोशल मीडियावर ट्रेंड केलं गेलं आहे. एका ट्विटर यूजरनं म्हटलं, की सोवॉनच्या या कृत्यामुळे माझी निराशा झाली, मात्र नंतर तिनं हे फोटो डिलीट केले. तिनं यासाठी माफी मागायला हवी. नाझींकडे प्रेमानं पाहायला किंवा त्यांना मीठी मारायला ते आपले मित्र नाहीत. ते मारेकरी आहेत. त्यांनी 6 दशलक्ष ज्यू लोकांचा जीव घेतला. यात दीड दशलक्ष लहान मुलंही होती. तर, एका यूजरनं म्हटलं, की 1995 मध्ये जन्मलेल्या एका महिलेला या युनिफॉर्मबद्दल किंवा हे कशाचं प्रतिक आहे, हे माहिती नसणं अपेक्षित नाही. तर, एकानं म्हटलं, की प्रत्येक कोरियन व्यक्तीला याविषयी माहिती असणं गरजेचं आहे.
First published:

Tags: Singer

पुढील बातम्या