S M L

भारताच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त लोकांनी 'हे' गाणं पाहिलं 'Despacito'

युट्युबवर गेल्या सहा महिन्यात तब्बल 2 अब्ज व्हिव्यूज मिळाले आहे. आतापर्यंत या गाण्याला 14,086280 इतके लाईक्स मिळाले

Sachin Salve | Updated On: Jul 12, 2017 07:20 PM IST

भारताच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त लोकांनी 'हे' गाणं पाहिलं 'Despacito'

12 जुलै :  2012 मध्ये दक्षिण कोरियाचा गायक पीएसवायच्या 'गँगम स्टाईल' गाण्याने अवघ्या जगाला वेड लावलं होतं. आता अशाच एका गाण्याची सुनामी आलीये आणि हे गाणं आहे 'Despacito'... विशेष म्हणजे युट्यूबवर या गाण्याला एखाद्या देशाची लोकसंख्या जितकी असेल तितके व्हिव्यूज मिळाले आहे.

'Despacito'... हे एक स्पॅनिश गाणं आहे. आता स्पॅनिश गाणं असल्यामुळे फारसं लोकांना हे कळत नाही. जे स्पॅनिश जाणतात त्यांना हे गाणं सहज समजून येईल. पण जे स्पॅनिश नाही त्यांना हे फारसं कळणार नाही. पण हे गाणं ज्याने ऐेकलं तो या गाण्याचा 'दिवाना' झालाय. वारंवार हे गाणं ऐकायला भाग पाडतंय.

मुळात हे एक सामान्य रॅप साँग आहे. तुम्ही हनी सिंग आणि बादशाहच्या कोणत्याही गाण्यासोबत तुलना करू शकतात. या गाण्याचे बोल 'Despacito' म्हणजे हळूहळू किंवा Slowly आहे.

हे गाणं चर्चेत येण्याचं कारण म्हणजे या गाण्याचं करण्यात आलेलं जबरदस्त व्हिडिओग्राफी...प्युर्तो रिकोचे लोकप्रिय रॅपर डॅडी यँकी आणि पाॅप स्टार लुई फोंसीने या गाण्यात जबरदस्त रॅप केलाय.

जगभरात हे गाणं पाहिलं आणि ऐकलं जात आहे. लोकप्रिय पाॅपस्टार जस्टिन बीबरला या गाण्याने वेडं लावलं. त्यानेही या गाण्याच्या एका व्हर्जनमध्ये जुगलबंदी केलीये. पण एका लाईव्ह काॅन्सर्टमध्ये या गाण्याचे बोल माहीत नसल्यामुळे  जस्टिन बीबरला लोकांच्या रोषाला सामोर जावं लागलं. परंतु, जस्टिन बीबरने या गाण्यात भागिदारी घेत गाण्याला नवा प्रेक्षकवर्ग मिळवून दिला.  बीबरच्या गाण्याचा व्हिडिओ तयार केला नाही पण एका गाण्याचा रुपात युट्यूबवर ते उपलब्ध आहे.

Loading...

 

गाण्याचे बोल काय ?

जर हे गाणं ऐकल्यानंतर तुम्हाला समजलं नसेल तर चिंता करण्याची गरज नाही. कारण देशभरात असे काही कलाकार आहे ज्यांनी या गाण्याचं वेगवेगळ्या भाषेत भाषांतर करून व्हिडिओ युट्यूबवर प्रसिद्ध केलंय.

तुमच्या माहितीसाठी सांगायचं ठरलं तर हे एक रोमँटिक गाणं आहे. एक प्रियकर आपल्या प्रेयसीला हळूहळू (Despacito) प्रेम करण्यासाठी सांगतोय.

युट्यूबवर तुफान व्हिव्यूज

या गाण्याने लोकांना इतकं वेड लावलंय की, युट्युबवर गेल्या सहा महिन्यात तब्बल 2 अब्ज व्हिव्यूज मिळाले आहे. आतापर्यंत या गाण्याला 14,086280 इतके लाईक्स मिळाले आहे. एवढंच नाहीतर 698,091 कमेंटसही मिळाल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: Despacito
First Published: Jul 12, 2017 07:14 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close