जस्टिन बीबरही नैराश्यग्रस्त, चाहत्यांकडे केली प्रार्थनेची मागणी

जस्टिन बीबरही नैराश्यग्रस्त, चाहत्यांकडे केली प्रार्थनेची मागणी

कॅनेडियन वंशाचा जस्टिन बीबर सध्या नैराश्यग्रस्त आहे. याबद्दल बोलताना त्याने इन्स्टाग्रामवर एक भावुक पोस्ट शेअर केली.

  • Share this:

न्युयॉर्क, १२ मार्च २०१९- हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक जस्टिन बीबर सध्या नैराश्यग्रस्त झाला आहे. यामुळेच गेल्या अनेक महिन्यांमध्ये त्याचं एकही गाणं प्रदर्शित झालं नाही. नुकतेच त्याने आपल्या डिप्रेशनच्या लढाईबद्दल मोकळेपणाने चर्चा केली. जस्टिन म्हणाला की, मी संपूर्ण जगापासून तुटला गेलो होतो आणि ती भावना फार विचित्र होती.

कॅनेडियन वंशाचा जस्टिन बीबर सध्या नैराश्यग्रस्त आहे. याबद्दल बोलताना त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. याचबरोबत त्याने केन्ये वेस्ट आणि स्कूटर ब्राउन यांच्यासोबतचा फोटोही शेअर केला.


जस्टिन म्हणाला की, नैराश्यासोबतच्या लढ्यात त्याला फार संघर्ष करावा लागत आहे. त्याला जगापासून दूर गेल्यासारखं वाटतंय आणि मनात सतत विचित्र भावना येत आहेत. यानंतर जस्टिन म्हणाला की, ‘मी नेहमीच पुनरागमन केले आहे. त्यामुळे यावेळीही मी फार चिंता करत नाहीये. फक्त तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा हे सांगण्यासाठी मी इथे आलो आहे. देवावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि तुमच्या प्रार्थनेलाही यश मिळेल. धन्यवाद.’

गेल्या महिन्यात अशी बातमी समोर आली होती की, जस्टिन आपल्या मानसिक आजारावर उपचार करून घेत होता. याशिवाय जस्टिनच्या ढासळत्या मानसिक स्थितीशी निगडीत अनेक गोष्टी सोशल मीडियावर सध्या शेअर होत आहेत.

VIDEO: सुजय पाटील यांच्या भाजप प्रवेशावर अशोक चव्हाण म्हणाले...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 12, 2019 05:34 PM IST

ताज्या बातम्या