जस्टिन बिबर मुंबईत दाखल, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

जस्टिन बिबर मुंबईत दाखल, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

  • Share this:

10 मे: गेले  बऱ्याच दिवसांपासून चरेचेत असलेला लोकप्रिय कॅनडियन पॉपस्टार जस्टिन बिबर अखेर भारतात दाखल झाला आहे. मध्यरात्री मुंबई विमानतळावर जस्टिन बिबरचं आगमन झालं. यावेळी त्याची झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी  विमानतळाबाहेर तोबा गर्दी केली होती.

नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर जस्टिच्या लाईव्ह कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं आहे. कॉन्सर्टला 50 हजार चाहते उपस्थित राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे डी. वाय. पाटील परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या आयोजकांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुरक्षायंत्रणा आणि जवळपास 500 पोलिसांच्या सहाय्याने कार्यक्रमस्थळी सुरक्षाव्यवस्थेची सोय केली आहे. ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेरा यांच्या सहाय्याने कार्यक्रमातील प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवली जाणार आहे.

दरम्यान, हा शो जरी सहा वाजता सुरू होणार असला, तरी जस्टिनचे चाहते सकाळपासूनच स्टेडियमबाहेर गर्दी करायला लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या शो निमित्तान नवी मुंबईत अनेक मार्ग बदलण्यात आलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 10, 2017 11:33 AM IST

ताज्या बातम्या