घोर फसवणूक! जस्टिन बिबरची फक्त 'लिप सिंक'?

केवळ लिप सिंकसाठी एवढा खर्च कशाला, असा सवालही अनेकांनी केला

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 12, 2017 10:49 AM IST

घोर फसवणूक! जस्टिन बिबरची फक्त 'लिप सिंक'?

12 मे : पॉपस्टार जस्टिन बिबर हा भारतामध्ये येणार म्हणून मोठा गाजावाजा करण्यात आला. जस्टिनच्या स्वागतासाठी जय्यत तयारीही करण्यात आली होती त्यानंतर जस्टिन बीबरचा भारतातील पहिला शो चाहत्यांच्या तुफान गर्दीत पार पडला. मात्र, जस्टीन बीबरने त्याच्या चाहत्यांची घोर फसवणूक केल्याचं बोलल जात आहे. अनेकांचं असं म्हणणं आहे की, जस्टिनने काही गाणी गायलीच नाहीत. तो फक्त लिप सिंक करत होता. त्यांने चाहत्यांसाठी फक्त चारच गाणी गायली तर बाकीची सर्व रेकॉर्डडेड गाणी होती, असा त्याच्यावरआरोप लावला जात आहे.

10 मे राजी नवी मुंबईत पार पडलेल्या जस्टिन बिबरच्या तोबा गर्दी झाली होती. त्याची एक झलक पाहण्यासीठी चाहत्यांनी हजारो रुपयांची तिकीटं खरेदी केली. मात्र या कॉन्सर्टनंतर जस्टिन बिबरवर आता टीका होऊ लागली आहे. जस्टिनने प्रत्यक्ष गाणी गायली की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जस्टिनचा लाइव्ह परफॉर्मन्स सुरू असताना तो पाणी पिण्यासाठी थांबला पण बॅकग्राऊंडला गाणं मात्र सुरूच होतं. हा प्रकार अनेक चाहत्यांना खटकला. त्यामुळे जस्टिन केवळ ओठांची हालचाल करून चाहत्यांची फसवणूक तर करत नव्हता ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

ट्विटरवर तर #LipSync हा हॅशटॅग ट्रेंड झाला असून ट्विपल्स तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. हजारोंचं तिकीट खरेदी करुन, इतके दिवस वाट पाहून प्रचंड गर्दीत जस्टिनला पाहण्यासाठी त्याच्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये 50 हजारपेक्षा जास्त चाहत्यांची गर्दी होती. पण, आता मात्र या कॅनेडीयन पॉपस्टारने चाहत्यांना एक प्रकारे फसवलंच आहे, असा आरोप त्याच्यावर लावला जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 12, 2017 09:55 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...