मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /RRRच्या तूफान यशानंतर Junior NTRच्या नव्या सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज

RRRच्या तूफान यशानंतर Junior NTRच्या नव्या सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज

RRRच्या तूफान यशानंतर Junior NTRच्या नव्या सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज

RRRच्या तूफान यशानंतर Junior NTRच्या नव्या सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज

अभिनेता ज्युनिअर एनटीआर ( Junior NTR) नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी नवी कलाकृती घेऊन येत असतो. आज त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. ( Junior NTR upcoming movie NTR 30)

मुंबई, 20 मे - "नाटू नाटू" म्हणत केवळ टॉलिवूडच नाही तर बॉलिवूड प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या आरआरआर (RRR) सिनेमाचा मुख्य नायक म्हणजे ज्युनिअर एनटीआर (Junior NTR) त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर गेली अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. हाच ज्युनिअर एनटीआर आज त्याचा 39वा वाढदिवस (Junior NTR Birthday) साजरा करत आहे. एनटीआर सध्या आरआरआर सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आहे. आरआरआर सिनेमाला प्रेक्षकांनी दिलेल्या तूफान प्रतिसादानंतर ज्युनिअर एनटीआर आता नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून NTR 30 या नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली असून सिनेमाचे पहिले मोशन पोस्टर ( NTR 30 Motion Poster) रिलीज करण्यात आले आहे. ज्युनिअर एनटीआरने वाढदिवशी त्याच्या चाहत्यांनी सिनेमाच्या माध्यमातून रिटर्न गिफ्ट दिले आहे. एनटीआरच्या नव्या सिनेमाविषयी कळल्यानंतर त्याचे चाहते देखील खूश झाले असून नव्या सिनेमासाठी फार उत्साही आहेत. ( Junior NTR upcoming movie  NTR 30)

ज्युनिअर एनटीआरने स्वत: त्याच्या सोशल मीडियावरुन सिनेमाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. 46 सेकंदाच्या या मोशन पोस्टरमध्ये समुद्राला उधाण आल्याचं दिसत आहे. दोन बोटींच्यामध्ये उभ्या असलेल्या ज्युनिअर एनटीआरचा खतरनाक लूक समोर आला आहे. त्याचा हा लूक पाहून चाहते चांगलेच हैराण झाले. हा सिनेमा एक्शन आणि ड्रामाने भरलेला असणार हे या मोशन पोस्टरवरुन लक्षात येत आहे.

हेही वाचा -  पाकिस्तानी कलाकार म्हणतो, 'मैं शाहरुख खान हूँ', बायोपिकच्या चर्चेवरही दिलं उत्तर

असे सांगितले जात आहे की, या सिनेमात पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ज्युनिअर एनटीआरसह स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. तसेच अभिनेता मंदावा साई कुमार देखील प्रमुख भूमिकेत असणार आहे. एक्शन ड्रामा असलेल्या या सिनेमात आणखी काय पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षकांना सिनेमाच्या ट्रेलरची उत्सुकता लागून आहे.

ज्युनिअर एनटीआरच्या वैयक्तिक आयुष्याविषयी

अभिनेता ज्युनिअर एनटीआरचा जन्म 20 मे 1983 रोजी झाला असून त्याचं संपूर्ण नाव नंद मूर्ति तारक रामा राव असं आहे. ज्युनिअर एनटीआरला साऊथ सिनेसृष्टीचा सलमान खान म्हणून ओळखले जाते. ज्युनिअर एनटीआरचे सर्वच सिनेमे हे हिट असून बॉलिवूड प्रेक्षकांमध्येही त्याच्या सिनेमांची क्रेझ आहे. ज्युनिअर एनटीआरला घरातूनच अभिनयाचे बाळकडू मिळाले. त्याचे वडील प्रसिद्ध निर्माते नंदमुरी हरिकृष्णा असून त्याचे आजोबा एनटीरामा राव हे देखील साऊथ सिनेसृष्टीत काम करत होते.

First published:

Tags: Entertainment, South film, South indian actor, Tollywood