Home /News /entertainment /

Rohit Raut And Juilee jogalekar Wedding : शुभमंगल सावधान! अखेर रोहित -जुईलीच्या डोई पडल्या अक्षता

Rohit Raut And Juilee jogalekar Wedding : शुभमंगल सावधान! अखेर रोहित -जुईलीच्या डोई पडल्या अक्षता

Rohit Raut And Juilee jogalekar Wedding :कपल रोहित राऊत (Rohit Raut) आणि जुईली जोगळेकरने (Juilee Jogalekar) 23 जानेवारीला पुण्यातील ढेपे वाड्यात लग्नगाठ ( juilee jogalekar and rohit raut wedding ) बांधली आहे.

  पुणे, 23 जानेवारी- मागच्या कही दिवसांपासून मराठी संगीत विश्वातील कुलेस्ट कपल रोहित राऊत (Rohit Raut) आणि जुईली जोगळेकर (Juilee Jogalekar) यांच्या घरी लगीनघाई पाहायला मिळत होती. संगीत सोहळा असेल किंवा मेंदी सोहळा रोहित आणि जुईली फुलटू आनंद घेताना दिसले. आज, 23 जानेवारीला पुण्यातील ढेपे वाड्यात रोहित आणि जुईलीने लग्नगाठ ( juilee jogalekar and rohit raut wedding ) बांधली आहे. राजश्री मराठीने या दोघांच्या लग्नातील गोड क्षणाचे काही सुंदर फोटो (Rohit Raut And Juilee jogalekar Wedding Photos ) शेअर केले आहे. चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. दोघेही खूपच सुंदर दिसत आहेत. रोहित आणि जुईलीने पारंपारिक पद्धतीने पुण्यातील ढेपे वाड्यात लग्नगाठ बांधली आहे. दोघांनीही पारंपारिक कपडे परिधान केले आहेत. जुईलीने जांभळ्या रंगाची नऊवारी घातली आहे व त्याच्यासोबत पारंपारिक दागिने घातले आहेत. तर रोहितने देखील तिच्या नऊवारीला मॅच होणार कुर्ता आणि धोतर परिधान केले आहे. आयुष्यभरासाठी ही जीडी बंधनात अडकली आहे.
  खूप वर्षाच्या डेटिंग नंतर रोहित आणि जुईली लग्नगाठ बांधली आहे. मराठीतील हे कुलेस्ट कपल सोशल मीडियावर नेहमी फोटो शेअर करत असते. रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरची पहिली भेट ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ च्या मंचावर झाली होती. यानंतर मैत्री आणि नंतर डेटिंग आण आता दोघेही लग्नगाठ बांधणार आहेत.जुईली नव्या पिढीची गायिका आहे.जुईलीचे सोशल मीडियावर देखील खूप चाहते आहेत. शिवाय तिचं युट्यूब चॅनेल देखील आहे. रोहितचा देखील सोशल मीडियावर प्रचंड चाहता वर्ग आहे. विशेषकरून त्याची तरूणींमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळते.
  यापूर्वी मराठी विश्वातील क्यूट कपल सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरने पुण्यातील ढेपे वाडा येथे पारंपारिक पद्धतीने लग्नगाठ बांधली आहे. य़ाशिवाय लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिने देखील तिच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रम याचा वाड्यात साजरा केला होता.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या