मुंबई, 14 डिसेंबर: बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला सध्या चिंतेत पडली आहे. मुंबई एअरपोर्टवर तिचं हिऱ्यांचं कानातलं हरवलं आहे. जुही हे कानातलं गेल्या 15 वर्षांपासून वापरत आहे. अर्थातच ते तिचं अतिशय आवडीचं कानातलं आहे. तिने कानातलं शोधण्यासाठी चक्क सोशल मीडियाची मदत घेतली आहे. जुहीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कानातलं शोधून देणाऱ्यास मिळणार बक्षीस
जुहीने ट्विटरवर पोस्ट केली आहे, ‘मी मुंबई विमानतळावरील गेट नंबर 8 वर होते. एमिरेट्स काऊंटरवर मी चेक इन केलं. त्यानंतर सिक्युरिटी चेकिंगही झालं. या सगळ्यात माझं हिऱ्याचं कानातलं कुठेतरी पडलं. कृपया कोणीतरी मला मदत करा. तुम्हाला माझं कानातलं सापडलं तर पोलिसांना याबद्दल माहिती द्या. मी 15 वर्षांपासून हे कानातले वापरत आहे. मला ते अतिशय आवडतं. हे कानातले शोधायला मला मदत करा.’ अशी पोस्ट लिहीत तिने एका कानातल्याचा फोटोही शेअर केला आहे. जी व्यक्ती हे कानातलं परत देईल त्याला जुहीकडून बक्षीसही देण्यात येणार आहे.
Kindly help 🙏 pic.twitter.com/bNTNYIBaZ2
— Juhi Chawla (@iam_juhi) December 13, 2020
जुहीच्या पोस्टवर कॉमेंट्सचा पूर
जुहीच्या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कॉमेंट्स केल्या आहेत. आत्तापर्यंत 6000 लोकांनी तिची पोस्ट लाइक केली आहे. तुझे कानातले तुला नक्की परत मिळतील अशी आशा नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पण अजूनही जुहीचे कानातले कोणालाही सापडले नाहीत.