VIDEO जुही चावलामुळे हिट झाली बॉलिवूडमधल्या २ खानांची 'ही' गाणी

VIDEO जुही चावलामुळे हिट झाली बॉलिवूडमधल्या २ खानांची 'ही' गाणी

अभिनेत्री जुही चावला आज 51 वर्षांची झाली. शाहरुख आणि आमिर खानच्या या चित्रपटांतली गाणी जुहीमुळे हिट झाली. पाहा जुहीची तीच बेस्ट 4 गाणी

  • Share this:

आमिर खानसोबत 1988 मध्ये आलेला ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटातील ‘गजब का है दिन’ हे गाणं आजही प्रसन्न करतं. गाण्यातील जुहीचे हावभाव तिच्या प्रेमात पडायला भाग पाडतात. आमिर आणि जुहीची नवी जोडी त्याकाळात खूप गाजली होती.

1993 रोजी अलेला 'डर' चित्रपटातील डायलॉग जितके प्रसिद्ध झाले तितकेच या चित्रपटाची गाणीही गाजली होती. ‘जादू तेरी नजर’ या गाण्याचे शब्द कानावर पडताच तुम्ही स्वत:हून हे गाण गूणगुणू लागता.

90च्या काळात शाहरूखसोबत जुहीने अनेक सिनेमे केले आहेत. 1997 मधील 'यस बॉस' सिनेमातील 'मे कोई ऐसा गीत गाऊ' हे गाणं आजही तितक्याचं आवडीने ऐकलं जातं. त्यावेळी या गाण्याला सर्वोकृष्ट संगीताचा फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला होता.

1997 यावर्षी जुहीचा आणखी एक सिनेमा हिट झाला होता. 'इश्क' चित्रपटातील ‘निंद चुराई मेरी किसने ओ सनम’ हे गाणं आजही आवडीने पाहिलं जातं. गाण्यात चित्रित करण्यात आलेला विनोदी क्षण पहायला लोकांना आवडतो. दिग्दर्शक रोहित शेट्टीनं या गाण्याचा रिमेक ‘गोलमाल अगेन’ या सिनेमात केलं गेलं. पण जुही चावलाच्या नटखट अंदाज पाहण्यासाठी हेच गाणं जास्त पाहिलं जातं.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 13, 2018 12:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading