मुंबई 15 जून: झी मराठीवरील प्रसिद्ध विनोदी कार्यक्रम (
Chala Hawa Yeu Dya) ‘चला हवा येऊ द्या’ गेली जवळपास आठ वर्ष प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाचं वेड आजही टाकतच असून इथे प्रमोशनल येण्यासाठी मराठीच नव्हे तर बॉलिवूडची मंडळीसुद्धा उत्सुक असतात. या कार्यक्रमात अशाच एका खास टीमने नुकतीच हजेरी लावली.
बॉलिवूडचा धमाल फॅमिली एंटरटेनमेंट असणारा ‘जुग जुग जियो’ (
Jug Jug Jeeyo) हा चित्रपट येत्या 24 जून रोजी रिलीज होणार आहे. एका फॅमेलीची अतरंगी गोष्ट असणारा हा चित्रपट कॉमेडी, ड्रामा आणि इमोशनने परिपूर्ण चित्रपट असणार आहे. या चित्रपटाची टीम नुकतीच हवा येऊ द्या च्या कार्यक्रमात हजेरी लावून गेल्याच समोर येत आहे. (
Anil Kapoor) झक्कास हिरो अनिल कपूर, (
Varun Dhawan) कुक्कड मुंडा वरूण धवन तर (
Kiara Advani) क्युट अभिनेत्री किआरा अडवानी या सुपरहिट बॉलिवूड कलाकारांनी या शो मध्ये हजेरी लावली आणि आपल्या फिल्मचं प्रमोशनसुद्धा केलं.
या कार्यक्रमाच्या सेट्वरुन खुद्द वरुण धवनने खखळून हसतानाच्या काही इंस्टाग्राम स्टोरी सुद्धा शेअर केल्या. यात अनिल कपूर आणि किआरा अडवानी बेफाम हसताना दिसत आहेत आणि हवा येऊ द्या ची टीम एका धमाल स्किटचं सादरीकरण करताना दिसत आहे.

जुग जुग जियो या चित्रपटाच्या अनेक गाण्यांबद्दल सध्या चर्चा होत असून सोशल मीडियावर सुद्धा ही गाणी धुमाकूळ घालताना दिसत आहेत. नुकतीच या टीमने मुंबई मेट्रोचा आनंद लुटत त्यातून सफर केल्याची बातमी समोर आली होती. काही कारणांमुळे या टीमला ट्रोलिंगला सुद्धा सामोरं जावं लागलं होतं. खूप काळानंतर एक रिफ्रेशिंग फॅमिली ड्रामा असलेला हा चित्रपट प्रेक्षागृहात येणार असल्याने नक्कीच याबद्दल बरीच उत्सुकता आहे.
हे ही वाचा- लेकीचा चेहरा दाखवल्याने मीडिया हाऊसवर भडकली अनुष्का शर्मा, पोस्ट लिहित केला राग व्यक्त
चला हवा येऊ द्या बद्दल सांगायचं झालं तर या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेबद्दल सांगायलाच नको. अत्यंत गुणी कलाकारांच्या टीमने भरलेला हा शो सगळ्या कलाकारांसाठी आकर्षण राहिला आहे. या शो मध्ये अनेक मातब्बर बॉलिवूड मंडळींनी सुद्धा या आधी हजेरी लावली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.