27 मे : अली फझल आणि जेम्स बॉण्डमधली एम म्हणजेच अभिनेत्री ज्युडी डेंच यांनी यावर्षी व्हिक्टोरिया अँण्ड अब्दुल हा हॉलिवूडपट केला होता. या सिनेमात ज्युडीने इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया आणि अलीने तिचा सेवक अब्दुलची भूमिका केली होती. या दोघांच्या मैत्रीवर हा सिनेमा आधारित होता.
या सिनेमात आंबे खाण्याचा एक सीन होता. ज्यात ज्युडी यांनी आपण आजवर कधीही आंब्याची चव पाहिली नसल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे अलीने आंब्याच्या मोसमात ज्युडी यांच्यासाठी थेट लंडनला आंब्याची पेटी पाठवली. अलीची ही भेट मिळाल्यावर ज्युडी फारच खूश झाल्याचं त्याने नंतर सांगितलं.