कंगना रणौतच्या विरोधात उभा राहिला राजकुमार राव, पोलिसही झाले ‘कनफ्युज’

कंगना रणौतच्या विरोधात उभा राहिला राजकुमार राव, पोलिसही झाले ‘कनफ्युज’

Kangana Ranaut Rajkumar Rao Judgemental Hai Kya सिनेमात दुहेरी हत्याकांड दाखवण्यात आले आहे. या खुनाची चौकशी पोलीस करत असतात. अनेक गोष्टींचा विचार केल्यानंतर बॉबी (कंगना रणौत) आणि केशन (राजकुमार राव) या दोघांपैकीच एकाने खून केल्याच्या निर्णयावर पोलीस येते.

  • Share this:

मुंबई, 02 जुलै- कंगना रणौत आणि राजकुमार रावच्या बहुप्रतिक्षीत जजमेंटल है क्या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं तेव्हापासून हा सिनेमा चर्चेत होता. सुरुवातीला या सिनेमाचं नाव 'मेंटल है क्या' ठेवण्यात आलं होतं. मात्र नावाला होत असलेल्या विरोधाकडे पाहत निर्मात्यांनी सिनेमाचं नाव बदलून 'जजमेंटल है क्या' असं ठेवलं.

बालाजी मोशन पिक्चरच्या यूट्यूब चॅनलवरून हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. २ मिनिटं आणि ३७ सेकंदांच्या हा ट्रेलर फार दमदार आहे. हा ट्रेलरमध्ये तुम्हाला उत्सुकता, संभ्रम, थ्रील आणि रोमान्स पाहायला मिळेल. ट्रेलरमध्ये तुम्हाला त्या सर्व गोष्टी पाहायला मिळतात ज्याची तुम्ही अपेक्षा करतात. विशेष म्हणजे ट्रेलरमध्ये कंगना आणि राजकुमारची तुफान जुगलबंदी पाहायला मिळेल.

World Cup- खास रोहित शर्माचं शतक पाहायला ही मराठमोळी अभिनेत्री गेली इंग्लंडला

काय आहे कथा-

सिनेमात दुहेरी हत्याकांड दाखवण्यात आले आहे. या खुनाची चौकशी पोलीस करत असतात. अनेक गोष्टींचा विचार केल्यानंतर बॉबी (कंगना रणौत) आणि केशन (राजकुमार राव) या दोघांपैकीच एकाने खून केल्याच्या निर्णयावर पोलीस येते. आपल्या चित्र- विचीत्र वागण्यामुळे संकटात अडकलेल्या कंगनाला पोलीस २० हजार रुपयांचा दंड भर किंवा मेंटल हॉस्पीटलमध्ये जा असे दोन पर्याय देते. यावर कंगना मेंटल हॉस्पिटलमध्ये जाण्याचा पर्याय निवडते. तिकडे राहत असतानाच तिला राजकुमार आवडायला लागतो. जेव्हा कंगना राजकुमारसोबत जास्तीत जास्त वेळ घालवते तेव्हा तिला कळतं की खून राजकुमारनेच केला असून ती यात अडकत जातेय. ज्या खुन्याला पोलीस आतापर्यंत शोधत असता त्यातच कंगना आणि राजकुमार एकमेकांविरुद्ध उभे राहतात.

…म्हणून युवराज सिंगच्या पार्टीत अंगद बेदी- नेहा धुपिया दिसले नाहीत

बालाजी टेलिफिल्म्सची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. पोस्टर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, तिच्या डोक्यात नक्की काय सुरू आहे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. पण असं केल्याने आम्ही जजमेंटल होऊ का? दरम्यान या सिनेमाचे मोशन पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले होते. या पोस्टरमध्ये राजकुमार राव वॉशिंगमशीनवर एका अज्ञात मुलीसोबत बसलेला दिसत होता. तक कंगना मशीनच्या आतमध्ये लपून राजकुमारवर लक्ष ठेवत असल्याचं दाखवण्यात आलं.

दिराच्या लग्नात रडली प्रियांका चोप्रा, हे आहे कारण

First published: July 2, 2019, 9:55 PM IST

ताज्या बातम्या