30 मार्च : 'द कपिल शर्मा' शोमध्ये आता नव्या रिंकू भाभीची एन्ट्री होतेय. प्रसिद्ध विनोदवीर जाॅनी लिवरची मुलगी जॅमी लिवर आता कपिलसोबत दिसणार आहे. जॅमी रिंकू भाभीची भूमिका साकारेल. ही भूमिका सुनील ग्रोवर करायचा.
कपिल आणि सुनीलचं भांडण झाल्यामुळे शोचा टीआरपी खाली आला होता. म्हणून या शोमध्ये नव्या कलाकारांना घेतलंय. त्यात आता भर पडणार आहे जॅमीची.
कपिल शर्माच्या किस किस को प्यार करूं सिनेमात जॅमी दिसली होती. कपिल आणि तिच्यात चांगलं ट्युनिंगही होतं. म्हणूनच कपिलनं जॅमीला शोमध्ये आणायचं ठरवलं. बुधवारी झालेल्या शूटिंगमध्ये जॅमी होती.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा