मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Johnny Lever Birthday: एकेकाळी 100 रुपये कमाई असणाऱ्या विनोदवीराकडे आहेत महागड्या गाड्या,आलिशान बंगले; पाहा अभिनेत्याचं Net worth

Johnny Lever Birthday: एकेकाळी 100 रुपये कमाई असणाऱ्या विनोदवीराकडे आहेत महागड्या गाड्या,आलिशान बंगले; पाहा अभिनेत्याचं Net worth

Johnny Lever

Johnny Lever

आपल्या अभिनयामुळे आणि आपल्या कॉमिक टायमिंगमुळे लोकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता जॉनी लीव्हरने घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे केवळ सातवीपर्यंतच शिक्षण घेतले. पण आज जॉनी लीव्हर यांनी करोडोंची मालमत्ता कमावली आहे.

  • Published by:  Nishigandha Kshirsagar
मुंबई, 14 ऑगस्ट : बॉलिवूडचा दिग्गज विनोदवीर जॉनी लीव्हरने एकेकाळी प्रेक्षकांना आपल्या विनोदाने  खळखळून हसवले. ते आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. आज बॉलिवूडचा हा विनोदवीर 65 व्या वर्षात पदार्पण करत आहे. आज 14 ऑगस्ट रोजी जॉनी लीव्हरचा वाढदिवस आहे. 80 च्या दशकापासून ते आजपर्यंत जॉनीने प्रेक्षकांना पोट  धरून हसवले आहे. जॉनी लीव्हरने करियरच्या सुरुवातीला आयुष्यात प्रचंड स्ट्रगल केला आहे.पण एकेकाळी एकेएका पैशासाठी झगडणारा जॉनी लीव्हर आज कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे. आर्थिक अडचणींमुळे जॉनीने सातवीपर्यंत शिक्षण घेतल्याचे सांगितले जाते. एकेकाळी दिवसाला फक्त  100 रुपयांवर गुजराण करणाऱ्या  जॉनीला आज कशाचीही कमतरता नाही.आज वाढदिवसादिवशी बॉलिवूडच्या या विनोदवीराची नेट वर्थ नक्की किती आहे हे पाहू. आपल्या अभिनयामुळे आणि आपल्या कॉमिक टायमिंगमुळे लोकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता जॉनी लीव्हरने घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे केवळ सातवीपर्यंतच शिक्षण घेतले. त्यानंतर ते घर सांभाळण्यासाठी कामाला लागले. आज जॉनीने बॉलिवूडमध्ये आतापर्यंत साडेतीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम करून स्वत:चे एक खास स्थान निर्माण केले आहे. बर्‍याच संघर्षानंतर जॉनीने त्याचे आयुष्य बदलले आहे. जॉनी लीव्हरला पहिला ब्रेक 'दर्द का रिश्ता' चित्रपटात मिळाला. त्यानंतर ते नसीरुद्दीन शाहसोबत 'जलवा' मध्ये दिसले, पण त्यांना पहिल्या मोठे यश मिळाले ते  'बाजीगर' या चित्रपटामधून. लोकांना गुदगुल्या करून हसवणाऱ्या जॉनी लीव्हर यांनी आज करोडोंची मालमत्ता कमावली आहे. हेही वाचा - Amitabh Bachchan: अमिताभ यांचं गिफ्ट राजू श्रीवास्तव यांच्यासाठी ठरणार रामबाण औषध? पाठवला खास ऑडिओ caknowledge.com च्या रिपोर्टनुसार, जॉनी लीव्हर करोडपती आहेत. या साइटच्या डेटानुसार, जॉनी लीव्हरची एकूण संपत्ती  सुमारे 227 कोटी आहे. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की, एकेकाळी एवढे खडतर जीवन जगणाऱ्या  जॉनी लीव्हर यांनी एवढी संपत्ती कशी जमवली? तर  त्यांच्या कमाईचा मुख्य स्त्रोत आहे चित्रपटातील अभिनय. याशिवाय जॉनी अनेक ठिकाणी स्टेज शो देखील करतात. जॉनी लीव्हर हे सिने आणि टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन आणि मिमिक्री आर्टिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. जॉनीची प्रत्येक महिन्याची कमाई अंदाजे 1 कोटी आहे. तर या कॉमेडियनची वार्षिक कमाई सुमारे  12 कोटींच्या आसपास आहे.
यासोबतच जॉनी लीव्हर पश्चिम मुंबईतील लोखंडवाला येथे एका भव्य 3BHK अपार्टमेंटमध्ये कुटुंबासोबत राहतात. त्यांचे मुंबई शहरात आणखी काही फ्लॅट्स आहेत आणि एक सुंदर व्हिला देखील आहे. जॉनी याना  वाहनांची खूप आवड आहे, त्यांच्याकडे ऑडी क्यू7, होंडा अकॉर्ड, टोयोटा फॉर्च्युनर सारखी महागडी वाहने आहेत. जॉनी लीव्हरच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी 1984 मध्ये सुजातासोबत लग्न केले. जॉनी लीव्हर याना आज दोन मुले आहेत - एक मुलगा  आणि एक मुलगी. त्यांची दोन्ही मुले त्यांच्या वडिलांप्रमाणे विनोदी कलाकार आहेत आणि बॉलिवूडमध्ये काम करतात. अलीकडेच जॉनीने 'हंगामा 2' या चित्रपटात विनोदी भूमिका साकारली होती.
First published:

Tags: Bollywood actor, Bollywood News, Entertainment

पुढील बातम्या