मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Johnny Depp:अभिनेता-गायकच नव्हे तर उत्कृष्ट आर्टिस्टसुद्धा आहे जॉनी डेप; तब्बल इतक्या कोटींना केली पेंटिंग्सची विक्री

Johnny Depp:अभिनेता-गायकच नव्हे तर उत्कृष्ट आर्टिस्टसुद्धा आहे जॉनी डेप; तब्बल इतक्या कोटींना केली पेंटिंग्सची विक्री

गेल्या अनेक महिन्यांपासून एक्स-पत्नी एम्बर हर्ड यांच्यातील वादविवाद आणि मानहानी प्रकरणामुळे हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप प्रचंड चर्चेत होता.

गेल्या अनेक महिन्यांपासून एक्स-पत्नी एम्बर हर्ड यांच्यातील वादविवाद आणि मानहानी प्रकरणामुळे हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप प्रचंड चर्चेत होता.

गेल्या अनेक महिन्यांपासून एक्स-पत्नी एम्बर हर्ड यांच्यातील वादविवाद आणि मानहानी प्रकरणामुळे हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप प्रचंड चर्चेत होता.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 31 जुलै-   गेल्या अनेक महिन्यांपासून एक्स-पत्नी एम्बर हर्ड यांच्यातील वादविवाद आणि मानहानी प्रकरणामुळे हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप प्रचंड चर्चेत होता. हा खटला जिंकत जॉनीने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. जॉनी एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच एक चांगला गायकसुद्धा आहे. तसेच त्याला पेंटिंगचीही प्रचंड आवड आहे. अभिनेत्याने अनेक उत्कृष्ट पेंटिंग स्वतः बनवल्या आहेत. इतकंच नव्हे तर त्याने या पेंटिंगची विक्री करत अवघ्या काही तासांत कोट्यावधींची कमाई केली आहे.

'पायरेट्स ऑफ दी कॅरेबियन' या चित्रपटाच्या सीरिजमुळे जॉनी डेप जगभरात अफाट लोकप्रिय झाला होता. त्याचा एक चाहतावर्ग भारतातसुद्धा आहे. जॉनीनं नुकतंच यूके गॅलरी चेन, कॅसल फाइन आर्टच्या सहकार्याने हॉलिवूडच्या रॉक आयकॉनसाठी तयार केलेल्या आणि समर्पित केलेल्या पेंटिंगचा पहिला पेंटिंग संग्रह विक्रीसाठी ठेवला होता. या विक्रीतून जॉनीने काही तासांतच अफाट पैसा मिळवला आहे.

कॅसल फाइन आर्ट गॅलरीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लोकप्रिय हॉलिवूड गायक बॉब डायलनचं एक पेंटिंग शेअर केलं आहे. हे पेंटिंग अभिनेता जॉनी डेपनं रेखाटलं आहे. या फोटोमध्ये जॉनी पेंटिंग करण्यात मग्न असलेला दिसून येत आहे. यासोबतच जॉनीनेसुद्धा आपल्या इन्स्टा अकाउंटवर आपण काढलेल्या सर्व पेंटिंग्सची झलकही दाखवली आहे. या पेंटिंग्जमध्ये हॉलिवूड सेलिब्रिटींचं वर्णन दिसून येत आहे. विशेष म्हणजे जॉनीनं या संग्रहाला 'फ्रेंड्स अँड हीरोज' असं नाव दिलं आहे. आपल्या या पेंटिंगच्या संग्रहाची विक्री करत जॉनीने 3 मिलियन पौंड म्हणजेच तब्बल 28 कोटींहून अधिकची कमाई केली आहे.

(हे वाचा: Kiara Advani B'day: खरं नाव ते शिक्षण तुम्हाला माहितीयेत का कियारा अडवाणीच्या या खास गोष्टी?)

जॉनी डेपने बनवलेल्या या पेंटिंग्समध्ये बॉब डायलन, दिवंगत अभिनेत्री एलिझाबेथ टेलर, अल पचिनो आणि कीथ रिचर्ड्स यांसारखे लोकप्रिय कलाकार आहेत. कॅसल गॅलरीने जॉनीच्या या पेंटिंग्स शेअर करत लिहलंय, "'फ्रेंड्स अँड हीरोज' नावाचा हा रोमांचक नवीन कलेक्शन, त्याच्या ओळखीच्या लोकांसाठी आणि ज्यांनी त्याला एक व्यक्ती म्हणून पाहिलं आहे त्यांच्यासाठी हा एक पुरावा आहे'.

First published:

Tags: Actor, Entertainment, Hollywood