Satyameva Jayate 2 च्या शूटिंग दरम्यान जॉन अब्राहमला गंभीर दुखापत
जॉन अब्राहम (John Abrahim) वाराणसीमध्ये (varanasi) आपल्या आगामी ‘सत्यमेव जयते 2’ (Satyamev jayate 2) या चित्रपटाचं शूटिंग (Film shooting) करीत आहे. यावेळी त्याच्या उजव्या हाताच्या तळहातावर दुखापत (Injured) झाली आहे.
वाराणसी, 24 डिसेंबर: बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहम एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान जखमी झाला आहे. त्याच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. यावर उपचार करण्यासाठी तो वाराणसीच्या चितईपूर येथील एका खासगी रुग्णालयात आला होता. जॉन अब्राहमला डॉक्टरांनी प्रथमोपचार करून डिस्चार्ज दिला आहे. वाराणसी याठिकाणी जॉन 'सत्यमेव जयते 2' या चित्रपटाचं शूटिंग करत आहे. अभिनेता जॉन अब्राहमच्या दुखापतीची माहिती मिळताच रुग्णालयाबाहेर चाहत्यांची गर्दी सुरू झाली आहे. पण तत्पूर्वी जॉन अब्राहम उपचार करुन निघून गेला होता.
गेल्या काही दिवसांपासून जॉन अब्राहम वाराणसीमध्ये आपल्या आगामी ‘सत्यमेव जयते 2’ या चित्रपटाचं शूटिंग करीत आहे. आजही त्यानं चित्रपटाच्या काही भागांचं शूटिंग केलं होतं. यावेळी त्याच्या उजव्या हाताच्या तळहातावर जखम झाली आहे. त्यामुळं काही गंभीर दुखावत असेल, तर त्यावर वेळीच उपचार मिळावा म्हणून जॉन अब्राहमने जवळच्या रूग्णालयाला भेट दिली आहे.
जॉन अब्राहमच्या तळहाताला दुखापत झाली आहे. या दुखापतीनंतर डॉक्टरांनी त्याच्या तळहाताचा एक्स-रे देखील काढला होता. या एक्स-रे मध्ये कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याचं आढळून आलं आहे. पण होणाऱ्या वेदनांमुळे रुग्णालयानं त्याच्या तळहातावर पट्टी बांधली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस त्याला आराम करावा लागणार आहे. यावेळी जॉननं रुग्णालयात सुमारे 1 तास घालवला. सत्यमेव जयते या चित्रपटाच्या पहिल्या भागातही अॅक्शन सीन शूट करताना जॉन अब्राहम जखमी झाला होता.