'पागलपंती'च्या सेटवर 'या' अभिनेत्याला झाली दुखापत

'पागलपंती'च्या सेटवर 'या' अभिनेत्याला झाली दुखापत

सिनेमातील एक अ‍ॅक्शन सीन शूट करताना ही दुर्घटना घडली.

  • Share this:

मुंबई, 26 मे : 'परमाणु', 'सत्यमेव जयते' आणि 'रोमियो अकबर वॉल्टर' सारख्या अ‍ॅक्शन सिनेमांनंतर अभिनेता जॉन अब्राहम एका हलक्या फुलक्या कॉमेडी सिनेमात झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी जॉनने एका मुलाखतीत त्याला आता कॉमेडी सिनेमात काम करायचं असल्याचं म्हटलं होतं. जॉन सध्या अनीज बम्जी यांचा मल्टीस्टारर सिनेमा 'पागलपंती'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की, 'पागलपंती'च्या सेटवर शूटिंग दरम्यान जॉनला दुखापत झाली आहे.

'पागलपंती' सिनेमातील एक अ‍ॅक्शन सीन शूट करताना ही दुर्घटना घडली. जॉनच्या उजव्या हाताला दुखापत झाली असून डॉक्टरांनी त्याला काही दिवस शूटिंग थांबवून आराम करण्याचा सल्ला दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जॉनच्या उजव्या हाताच्या मांसपेशींना दुखापत झाली आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असल्यामुळे पुढच्या काही दिवसांसाठी या सिनेमाचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे.

सिनेमाच्या निर्मात्यांना याविषयी विचारलं असता ते म्हणाले, तो एक सिंपल सीन होता. पण टाइम चुकल्यानं जॉन जखमी झाला. सध्या तरी जॉनला 20 दिवस आराम करण्यास सांगण्यात आलं आहे पण एका आठवड्यानंतर जर त्याची तब्बेत ठीक असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं आम्ही लवकरच सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहोत. या सिनेमात जॉन अब्राहम व्यतिरिक्त अनिल कपूर, अरशद वारसी, पुलकित सम्राट, इलियाना डिक्रूज आणि कीर्ति खरबंदा अशी मोठी स्टारकास्ट आहे. या सिनेमाचं सर्वाधिक शूटिंग लंडनमध्ये झालं असून शेवटच्या काही भागाचं शूटिंग सध्या मुंबईमध्ये सुरू आहे. यावर्षी 22 नोव्हेंबरला 'पागलपंती' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

ICC World Cup 2019 मध्ये 'या' टीमला निक जोनसची पसंती

'या' प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीला लागलं होतं पॉर्न पाहण्याचं व्यसन

First published: May 26, 2019, 10:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading