'या' कारणासाठी निकच्या वहिनीनं लग्नाच्या 24 तास आधी जो जोनसशी केलं होतं ब्रेकअप

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सोफीनं अशाप्रकारे ब्रेकअप करण्यामागचं कारणही सांगितलं.

News18 Lokmat | Updated On: May 21, 2019 05:07 PM IST

'या' कारणासाठी निकच्या वहिनीनं लग्नाच्या 24 तास आधी जो जोनसशी केलं होतं ब्रेकअप

मुंबई, 21 मे : काही दिवसांपूर्वीच गेम ऑफ थ्रोन्स अभिनेत्री सोफी टर्नर आणि जो जोनस यांच्या सरप्राइझ वेडिंगमुळे सर्वच अवाक झाले होते. या नव्या जोडप्याचे अनेक सुंदर फोटो समोर आले आणि त्यानंतर सोफीच्या आयुष्याशी संबंधीत अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. पण नुकत्याच सोफीबाबत झालेल्या नव्या खुलाश्यानं मात्र सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सोफीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं लग्नाच्या काही तास अगोदर पती जो जोनसशी ब्रेकअप केलं होतं असा धक्कादायक खुलासा केला आहे.

'गेम ऑफ थ्रोन्स' या लोकप्रिय मालिकेत संसा स्टार्कची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री सोफी टर्नर आणि निक जोनसचा मोठा भाऊ जो जोनस काही दिवसांपूर्वी लास वेगासमध्ये लग्नाच्या बेडीत अडकले. पण त्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत सोफीनं लग्नाच्या 24 तास अगोदर मी आणि जो जोनसनं ब्रेकअप केलं होतं असा खुलासा केला. सोफीनं सांगितलं, मी आणि जो एकत्र येणं एवढं सोपं नव्हतं. पण लग्नाच्या अगोदर ब्रेकअप करून आम्ही दोघंही वेगळे झालो होतो.
Loading...

 

View this post on Instagram
 

With my love in the mountains 🏔


A post shared by Sophie Turner (@sophiet) on

संडे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सोफीनं असं करण्यामागचं कारणही सांगितलं. ती म्हणाली, खरं तर हे ब्रेकअप कोणत्याही प्रकारच्या भांडणामुळे नाही तर लग्नाच्या काही तास अगोदर वाटत असलेल्या भीतीमुळे झालं होतं. तो दिवस आमच्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होता. काही काळासाठी आम्ही दोघंही थंड पडलो होतो. पण 24 तासांनंतर आम्ही शांत झालो आणि त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला.
 

View this post on Instagram
 

Happy Valentine’s Day my love. You make me the happiest.


A post shared by Sophie Turner (@sophiet) on

'जो ने मला स्वतःवर प्रेम करायला शिकवलं. 2016 मध्ये आम्ही पहिल्यांदा भेटलो. त्यावेळी माझी मानसिक स्थिती ठीक नव्हती. मी खूप दुःखी आणि त्रासलेली होते. त्यावेळी त्यानं मला खूप आधार दिला आणि सांगितलं जो पर्यंत तु स्वतःवर प्रेम करत नाही तोपर्यंत मी तुझ्यासोबत नाही राहू शकत. त्यावेळी त्यानं सांगितलेल्या या सर्व गोष्टींमुळे माझा जीव वाचला.' अशा शब्दात सोफीनं जो बाबतच्या तिच्या भावना व्यक्त केल्या.


सनी लिओनी नाही तर 'या' अभिनेत्रीला पहिल्याच ऑडिशनला करावा लागला होता सेक्स सीन


अखेर ऐश्वर्यासमोर पुन्हा एकदा नमला विवेक ओबेरॉय, अशी मागितली जाहीर माफी


लोकसभेच्या बॉक्स ऑफिसवर हे बॉलिवूडकर ‘फ्लॉप’?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 21, 2019 03:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...