Home /News /entertainment /

Cannes Festival ला गालबोट; अभिनेत्रीचा लाखो रुपयांचा नेकलेस गेला चोरीला

Cannes Festival ला गालबोट; अभिनेत्रीचा लाखो रुपयांचा नेकलेस गेला चोरीला

यंदाचं कान फिल्म फेस्टिव्हलचं 74वं वर्ष होतं. मात्र या प्रतिष्ठित सोहळ्याला यंदा चोरीचं गालबोट लागलं आहे.

    मुंबई 13 जुलै: ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ (Cannes Film Festival) हा जगातील सर्वात प्रतिष्ठित अशा चित्रपट मेळाव्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. दरवर्षी जगभरातील विविध भाषांमधील लघुपट आणि नावाजलेले चित्रपट या फेस्टिव्हलमध्ये दाखवले जातात. अनेक लोकप्रिय सेलिब्रिटी देखील मोठ्या उत्साहानं या सोहळ्यात सामिल होतात. यंदाचं कान फिल्म फेस्टिव्हलचं 74वं वर्ष होतं. मात्र या प्रतिष्ठित सोहळ्याला यंदा चोरीचं गालबोट लागलं आहे. प्रसिद्ध ब्रिटिश अभिनेत्री जोडी टर्नर-स्मिथ (Jodie Turner Smiths) हिचा लाखो रुपयांचा नेकलेस चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (Jodie Turner Smiths jewellery robbed) यंदाच्या वर्षी कानवर कोरोनाचं सावट होतं. त्यामुळे विविध देशांमधून आलेल्या सर्व सेलिब्रिटींची एकाच ठिकाणी मेरिएट हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली होती. मात्र याच ठिकाणी अभिनेत्रीच्या चक्क रूममधून तिचा लाखो रुपयांचा नेकलेस चोरीला गेला. तिने ट्विट करून ही धक्कादायक माहिती आपल्या चाहत्यांना दिली. ‘देवदास’च्या सेटवर शाहरुखला व्हायचा हा त्रास; सांगितली 19 वर्ष जुनी आठवण 'अग्निपथ'मधील हृतिक रोशनची बहीण आठतेय का? आता दिसतेय फारच ग्लॅमरस आणि बोल्ड सध्या पॅरिसमधील पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. त्यांनी आतापर्यंत हॉटेलमधील सर्व सेलिब्रिटी आणि इतर स्टाफ मंडळींचं सामान चेक केलं आहे. परंतु तो नेकलेस त्यांना सापडलेला नाही. मात्र हा फिल्म फेस्टिव्हल संपण्याच्या आत तिला तिचा नेकलेस परस मिळेल असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Actress, Crime, Entertainment, Hollywood, Robbery Case

    पुढील बातम्या