मुंबई, 07 जानेवारी : जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये झालेल्या मारहाण आणि हल्ल्याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले. रविवारी 5 जानेवारीला रात्री काही बुरखाधारी लोकांनी युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थी आणि प्राध्यापकांना मारहाण केली. त्यानंतर या हल्ल्याचे पडसाद देशभरात उमटले. या हल्ल्याच्या विरोधात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी रस्त्यावर उतरले असून काल रात्रभर मुंबईमध्ये अनेक सेलिब्रेटी आंदोलन करताना दिसले. या दरम्यानं दिग्दर्शक विशाल भारद्वाजनं या आंदोलनात एक कविता सादर केली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.
जेएनयू हल्ला प्रकरणी बॉलिवूडकारांनी केलेल्या आंदोलनात दिग्दर्शनात दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी एक कविता वाचली. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. याशिवाय ही कविता विशाल यांनी त्याच्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवरही शेअर केली आहे. या कवितेच्या ओळी आहेत. 'हम मायूस नहीं हैं, हम हैरान नहीं, जैसा सोचा था तुम वैसे ही निकले' विशाल यांनी या कवितेतून भावुक अंदाजात JNU हल्ला प्रकरणी विरोध जाहिर केला. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. युट्यूब चॅनेल मोजो स्टोरीनं हा व्हिडीओ पब्लिश केला आहे.
टायगर श्रॉफला पोलिसांनी घातल्या बेड्या, वाचा नेमकं काय आहे कारण
विशाल भारद्वाज यांनी कवितेच्या काही ओळी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. यावेळी त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, अशाप्रकारे कायद्याची पायमल्ली करण्याला जबाबदार कोण आहे. विशाल यांची ही कविता सर्वांनाच आवडली असून हजारो लोकांनी ही कविता आतापर्यंत शेअर केली आहे.
अभिनेत्रीचा खुलासा, ‘65 वर्षीय प्रोड्युसरनं मला कपडे उतरवण्यास सांगितलं'
हम मायूस नहीं हैं, हम हैरान नहीं
जैसा सोचा था तुम वैसे ही निकले
रात में सूरज लाने का वादा करके
दिन में रात उगा कर दिखला दी तुमने
पानी पानी कह के बरसाया तेज़ाब
और इक आग लगा कर दिखला दी तुमने
हम मायूस नहीं हैं हम हैरान नहीं
Who is accountable for this lawlessness? #JNUattack
— Vishal Bhardwaj (@VishalBhardwaj) 6 January 2020
JNU मध्ये झालेल्या हल्ल्याचा याआधीही अनिल कपूर, आलिया भट, राजकुमार राव, ट्विंकल खन्ना, अनुराग कश्यप आणि सोनम कपूर यांनी निषेध केला होता. या हल्ल्याला सर्वांनीच भ्याड, भीतीदायक आणि निर्दयी म्हटलं आहे. असा भ्याड हल्ला करणाऱ्या व्यक्तींवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.
रोमान्स... थ्रील... आणि मर्डर... पाहा थरारक Malang Trailer