काँग्रेसशासित तीन राज्यांनी दीपिकाच्या 'छपाक'बाबत घेतला मोठा निर्णय

काँग्रेसशासित तीन राज्यांनी दीपिकाच्या 'छपाक'बाबत घेतला मोठा निर्णय

अभिनेत्री दीपिका पदुकोण जवळपास दोन वर्षानंतर ‘छपाक’मधून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतणार आहे.

  • Share this:

मुंबई 10 जानेवारी : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोनच्या 'छपाक'वरून सध्या देशभर चर्चा सुरू आहे. दीपिका जेएनयुमधल्या विद्यार्थ्यांना भेटायला गेली आणि वादाची ठिणगी पडली. 'छपाक'वर बहिष्कार घाला अशी मागणी होऊ लागली. तर त्याला जोरदार विरोधही सोशल मीडियावर करण्यात आलाय. भाजपने दीपिकावर टीकेची झोड उठवलीय तर काँग्रेस आणि विरोधीपक्षांनी तिला पाठिंबा दिलाय. या पार्श्वभूमीवर काँग्रेसशासित तीन राज्यांनी दीपिकाच्या 'छपाक'ला टॅक्स फ्री करण्याचा निर्णय घोषीत केलाय. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तिसगडने हा निर्मय घोषीत केलाय. 'छपाक' शुक्रवारी 10 जानेवारीला प्रदर्शित होतेय. तर त्या आधीच एक दिवस या राज्यांनी 'छपाक' टॅक्स फ्री केल्याने त्यावरही आता राजकारण सुरू झालंय. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ट्वीट करून याबाबतची माहिती दिलीय.

काही नेटकरी दीपिकाच्या विरोधात बोलत आहेत तर काही नेटकऱ्यांनी दीपिकाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ट्वीटरवर #boycottchhapaak आणि #ISupportDeepika असे दोन हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. छपाक सारखा सिनेमा करणारी दीपिका तुकडे-तुकडे गँगला भेटण्यासाठी गेली अशा टीका करत नेटकऱ्यांनी दीपिकाचा छपाक सिनेमा पाहू नका असा ट्रेंड सुरू केला आहे.

'छपाक' हा सिनेमा दिल्लीतील अ‍ॅसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अग्रवालच्या रिअल लाइफ स्टोरीवर आधारित आहे. या सिनेमा बद्दल आता ट्विटरवर नवा वाद सुरू झाला आहे. काही युजर्सचं म्हणणं आहे की, लक्ष्मीवर अ‍ॅसिड हल्ला करणाऱ्या व्यक्तीचं नाव नदीम खान असं होतं मात्र सिनेमात त्या व्यक्तिरेखेचं नाव राजेश असं ठेवण्यात आलं आहे. यावरुन मेकर्सनी असं जाणूनबुजून केल्याचं अनेक युजर्सचं म्हणणं आहे.

अभिनेत्री दीपिका पदुकोण जवळपास दोन वर्षानंतर ‘छपाक’मधून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतणार आहे. 10 जानेवारीला त्याच्या छपाक सिनेमा रिलीज होत आहे. याआधी दोन वर्षांपूर्वी तिचा पद्मावत सिनेमा रिलीज झाला होता. ज्यावर ऐतिहासिक मुद्द्यांवरुन काही आरोप लावण्यात आले होते. त्यानंतर आता छपाकबाबतही असंच काहीसं होताना दिसत आहे.

First published: January 10, 2020, 8:23 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading