Home /News /entertainment /

बहिणीला मिठी मारून ढसाढसा रडू लागली'जीव झाला येडापिसा'फेम सिद्धी; नेमकं काय घडलं?

बहिणीला मिठी मारून ढसाढसा रडू लागली'जीव झाला येडापिसा'फेम सिद्धी; नेमकं काय घडलं?

'जीव झाला येडा पिसा' (Jiv Zala Yeda pisa) या मराठी मालिकेतून सिद्धी (Siddhi) अर्थातच अभिनेत्री विदुला चौगुले (Vidula Chaogule) घराघरात पोहोचली आहे. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेऊन अनेक महिने झाले. तरीसुद्धा हे कलाकार सतत चर्चेत असतात.

पुढे वाचा ...
    मुंबई, 26 जून-   'जीव झाला येडा पिसा' (Jiv Zala Yeda pisa) या मराठी मालिकेतून सिद्धी  (Siddhi)  अर्थातच अभिनेत्री विदुला चौगुले  (Vidula Chaogule)  घराघरात पोहोचली आहे. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेऊन अनेक महिने झाले. तरीसुद्धा हे कलाकार सतत चर्चेत असतात. चाहत्यांना या कलाकरांबाबत जाणून घ्यायची उत्सुकता असते. विदुलाबाबत सांगायचं तर ती पडद्यापासून दूर असूनही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे. नुकतंच अभिनेत्रीने एक खास पोस्ट शेअर केली आहे पाहूया काय आहे ही पोस्ट. अभिनेत्री विदुला चौगुले सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांना आपल्या अपडेट्स देत असते. गेल्या काही दिवसांपासून विदुलाने आपल्या इन्स्टाग्रामवर अनेक फोटो शेअर केले आहेत. यावरून ती विदेशात असल्याचं दिसून येत होतं. गेल्या महिनाभरापासून अभिनेत्री विदेशात असल्याचं पाहायला मिळालं होतं. अनेकांना अभिनेत्री विदेशात नेमकं काय करत आहे? असा प्रश्न पडला होता. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, विदुला विदेशात आपल्या बहिणीजवळ गेली होती. विदुलाची बहीण वैदेही चौगुले सध्या मेलबर्नमध्ये आहे. कामाच्यानिमित्ताने ती सध्या त्याठिकाणी वास्तव्यास आहे. पडद्यावरून ब्रेक घेतल्याने विदुला आपल्या बहिणीजवळ मेलबर्नला पोहोचली होती. अभिनेत्रीने आपलं मेलबर्न व्हेकेशन प्रचंड एन्जॉय केल्याचं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंट वरुन दिसून येतं. सध्या अभिनेत्री भारतात परतली आहे. मात्र आपल्या बहिणीला सोडून येताना विदुला काहीशी भावुक झालेली दिसली. अभिनेत्री आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीला फोटो शेअर करत लिहलंय, 'मी किती भाग्यवान आहे की, कोणाला तरी निरोप घेताना इतकं कठीण जात आहे'. (हे वाचा:'आई कुठे काय करते' मालिकेतून अरुंधतीने घेतला ब्रेक; समोर आलं कारण ) विदुला 'जीव झाला येडा पिसा' या कलर्स मराठीवरील मालिकेमुळे प्रचंड लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील शिवा आणि सिद्धीची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडली होती. या मालिकेचं शूटिंग सांगलीजवळ झालं होतं. विदुला मूळची कोल्हापूरचीच आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment

    पुढील बातम्या