मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

‘जीव झाला येडा पिसा’ मालिकेतील अभिनेत्री करतेय या अभिनेत्याला डेट ; इन्स्टा पोस्ट करत दिली प्रेमाची कबुली

‘जीव झाला येडा पिसा’ मालिकेतील अभिनेत्री करतेय या अभिनेत्याला डेट ; इन्स्टा पोस्ट करत दिली प्रेमाची कबुली

अभिनेत्री शर्वरी जोग (sharvari jog)हिने सोशल मीडियावर प्रेमाची कबुली दिली आहे. शर्वरी एका अभिनेत्याला डेट करत आहे आणि त्याच्यासोबतचो फोटो देखील शेअर केले आहेत.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 8 नोव्हेंबर:  जीव झाला येडा पिसा या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या आजही  स्मरणात आहेत. मालिकेत शिवाच्या बहिणीची म्हणजेच सोनीची भूमिका अभिनेत्री शर्वरी जोग (sharvari jog)हिने साकारली होती. शर्वरी जोगने सोशल मीडियावर प्रेमाची कबुली दिली आहे.

शर्वरी जोग ही अभिनेता गौरव मालनकर (gaurav malankar ) याच्या प्रेमात आहे. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर त्याच्यासोबत असलेल्या प्रेमाची कबुली तिने दिली आहे. गौरव मालनकर हा नाट्य तसेच मालिका अभिनेता आहे.गौरव मालनकर याने झी युवा वरील फुलपाखरू या गाजलेल्या मालिकेत भूमिका साकारली होती. गौरवने पथनाट्य, एकांकिका आणि आंतरमहाविद्यालयीन नाट्य स्पर्धा गाजवल्या आहेत.

शर्वरीने गौरवची पोस्ट रिपोस्ट करत म्हटले आहे की, दिवाळीच्या आणि पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..! पुढच्या वर्षी तरी "आली माझ्या घरी ही दिवाळी" हे म्हणायची संधी मिळेल का? आणि पुढच्या दिवाळीला "एकाच फोटोत" मी कुर्त्यामध्ये आणि तु साडी मध्ये असण्याची आशा करायला हरकत नाही. कारण तलाव पाळी ची मजा रंकाळ्यात नाही.. 😝...अशी गौरवची पोस्ट तिनं रिपोस्ट केली आहे.

वाचा : राजकुमार राव-पत्रलेखाचं ठरलं ! पारंपारिक पद्धतीने करणार लग्न, तयारी सुरू

शर्वरी जोग ही मूळची कोल्हापूरची आहे. शाळेत असल्यापासूनच शर्वरी बालनाट्यातून काम करत होती. तिचे वडील नाट्य क्षेत्राशी निगडित होते त्यामुळे तिला अभिनयाची आवड सुरुवातीपासूनच होती. मालिकेत येण्याअगोदर शर्वरीने प्रायोगिक नाटक आणि व्यावसायिक नाटकांमधून काम केलं आहे.जीव झाला वेडा पिसा या मालिकेतील सोनीच्या भूमिकेने शर्वरीला प्रसिद्धी मिळाली. विधिलिखित या वेबसिरीजमध्ये ती मध्यवर्ती भूमिकेत पाहायला मिळाली. सध्या सॅन मराठी वाहिनीवरील जाऊ नको दूर…बाबा या मालिकेतून ती अर्पिताच्या बहिणीची भूमिका निभावत आहे.

First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment, Tv serial