• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • जीव माझा गुंतला' फेम मल्हारचं अभिनयापूर्वी होतं हे प्रोफेशन! अनेक बॉलिवूड कलाकरांसोबत केलं आहे काम

जीव माझा गुंतला' फेम मल्हारचं अभिनयापूर्वी होतं हे प्रोफेशन! अनेक बॉलिवूड कलाकरांसोबत केलं आहे काम

'जीव माझा गुंतला' (Jiv Maza Guntala) ही मराठी मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय झाली आहे. अगदी अल्पवधीतच या मालिकेने चाहत्यांचं मन जिंकलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 19ऑक्टोबर- 'जीव माझा गुंतला' (Jiv Maza Guntala) ही मराठी मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय झाली आहे. अगदी अल्पवधीतच या मालिकेने चाहत्यांचं मन जिंकलं आहे. मालिकेतील मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या अंतरा-मल्हारला (Malhar) रसिक प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. त्यामुळे आपसूकचं चाहत्यांना या कलाकारांच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घायची इच्छा होत आहे. तर आज आपण मालिकेतील मुख्य अभिनेता मल्हार अर्थातच सौरभ चौगुलेविषयी(Saorabh Chaugule) काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.
  'जीव माझा गुंतला' या मालिकेमुळे मुख्य अभिनेत्याच्या रूपात घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे सौरभ चौगुले होय. मालिकेतील हँडसम, रागीट पण मनातून तितकाच हळवा मल्हारने चाहत्यांना भुरळ घातली आहे.मात्र फारच कमी लोकांना हे माहिती आहे, की हा आपला लाडका कलाकार फक्त अभिनेताच नव्हे तर एक उच्चशिक्षित अभिनेता आहे. सौरभने इंजिनियरिंग केलं आहे. वाटलं ना आश्चर्य? हो हे खरं आहे. या अभिनेत्याने इंजिनियरिंगची पदवी घेऊनही फक्त आवड असल्याने अभिनयाकडे आपला मोर्चा वळवला आहे. मात्र हे यश त्याला सहजासहजी मिळालेलं नाहीय. त्यासाठी त्याने अनेक अडचणी पार केल्या आहेत. अनेक कष्ट त्याने घेतले आहेत. अभिनेत्याने रंगमंचापासून अभिनयाला सुरुवात केली होती. आणि आज तो एका मुख्य अभिनेत्याच्या रूपात पडद्यावर झळकत आहे.
  सौरभने रंगभूमीवरून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्याने मुंबई-डोंबिवली भागातील अनेक नाटक संस्थांसोबत काम करत आपल्या अभिनयाला चालना दिली आहे. तसेच त्याने काही मालिका आणि चित्रपटांमध्ये सहाय्यकी भूमिका साकारल्या आहेत. इतकंच नव्हे तर त्याने 'दक्खनचा राजा ज्योतिबा'मध्ये खलनायकाची भूमिका साकारली होती. मात्र 'जीव माझा गुंतला' या मालिकेत त्याने पहिल्यांदाच मुख्य अभिनेता साकारला आहे. या मालिकेने सौरभला एक नवी ओळख निर्माण करून दिली आहे. कलर्स मराठीवर प्रसारित होणारी ही मालिका आज सर्वांची आवडती मालिका बनली आहे. कोल्हापूरवर आधारित असणाऱ्या या मालिकेने अल्पावधीतच रसिक प्रेक्षकांच्या मनात आपलं एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. मालिकेतील मल्हार आणि अंतराची टॉम अँड जेरी सारखी केमेस्ट्री चाहत्यांना फारच आवडते. (हे वाचा:जीव माझा गुंतला' फेम अंतराचा ग्लॅमरस अंदाज; तुम्ही पाहिला का ... ) सौरभ सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो सतत आपले फोटो आणि रिल्स चाहत्यांसाठी शेअर करत असतो. तसेच तो बऱ्याचवेळ स्वतः क्लिक केलेले काही आजूबाजूचे सुंदर फोटोही शेअर करत असतो. तुम्हाला सांगायला नक्कीच आवडेल सौरभ अभिनयापूर्वी फोटोग्राफी करत होता. आपल्या आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी त्याने फोटोग्राफर म्हणूनही काम केलं आहे. त्याने अनेक वेबसिरीज, शॉर्ट् फिल्म्स शूट केल्या आहेत. तो हिंदीतील 'जुडवा २'च्या शूटिंगचाही भाग होता. त्याने तापसी पन्नूसोबतच एक फोटो शेअर करत तिच्यासोबतच्या शूटिंगचा अनुभव सांगितलं होता. तसेच सौरभने वरून धवन, जॉन अब्राहम, राजकुमार हिरानी, अदिती राव हैदरी, फराह खान, सोनू निगम अशा दिग्ग्ज कलाकरांसोबत शूट केलं आहे. सध्या तो मल्हारच्या भूमिकेत सर्वांचं मन जिंकत आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: