• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • VIDEO:अंतरा सोडणार मल्हारचं घर? 'जीव माझा गुंतला' मालिकेत येणार नवं वळण

VIDEO:अंतरा सोडणार मल्हारचं घर? 'जीव माझा गुंतला' मालिकेत येणार नवं वळण

'जीव माझा गुंतला' (Jiv Maza Guntala) हि मराठी मालिका अल्पाधितच लोकप्रिय झाली आहे. मालिकेतील अंतरा (Antra) आणि मल्हारची (Malhar) अतरंगी केमेस्ट्री सर्वांनाच भावली आहे.

 • Share this:
  मुंबई, 7ऑक्टोबर- 'जीव माझा गुंतला' (Jiv Maza Guntala) हि मराठी मालिका अल्पाधितच लोकप्रिय झाली आहे. मालिकेतील अंतरा (Antra) आणि मल्हारची (Malhar) अतरंगी केमेस्ट्री सर्वांनाच भावली आहे. मात्र सध्या मालिकेत खूपच भावुक करणारा ट्रॅक सुरु आहे. नुकताच समोर आलेल्या नव्या प्रोमोमध्ये अंतरा मल्हारचं घर सोडून जात असल्याचं दिसत आहे.
  कलर्स मराठीवर 'जीव माझा गुंतला' हि मालिका आपल्या भेटीला येते. मालिकेत रिक्षा चालवणारी स्वाभिमानी अंतरा. आपल्या पतीच्या अर्थातच मल्हारच्या घरी अपमान सहन करून कशी राहू शकते? मालिकेत अंतराच्या पत्रिकेवर संशय व्यक्त केला जातो. त्यामुळे अंतराच्या स्वाभिमानाला मोठी ठेच लागते. आणि म्हणूनच अंतरा घर सोडून जाण्याचा मोठा निर्णय घेते.मात्र अंतराची सासू आणि मल्हारची आई सुहासिनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. मात्र त्यांचं वागणं आणि तिच्यावर दाखवलेला अविश्वास अंतराच्या जिव्हारी लागतो. आणि अंतरा मल्हारच्या घरी थांबण्यास नकार देते. नव्या प्रोमोमध्ये अंतरा घर सोडून जाण्यास निघाली आहे. आज्जी सासू तिला समजवायचा प्रयत्न करत आहे. मात्र अंतर त्यांची माफी मागून जायला निघाली आहे. आता अंतर जाणार कि आपला निर्णय बदलणार कि आणखी काही होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (हे वाचा:ट्रोल झाल्यानंतरही अरुंधती पुन्हा देशमुखांच्या घरी; म्हणाली, 'हिंमत असेल तर...') 'जीव माझा गुंतला' मालिकेत अंतराच्या मोठ्या बहिणीचं म्हणजेच श्वेताचं लग्न मल्हारशी ठरलेलं असतं. मात्र श्वेताने सर्वांचीच फसवणूक केलेली असते. अंतराच्या पत्रिकेतील दोष आपल्या पत्रिकेत नोंदवून घेतलेला असतो. ऐन लग्नाच्या दिवशी हे सत्य सर्वांसमोर येत आणि मंडपात अंतराला मल्हारच्या समोर लग्नासाठी उभं केलं जात. अशा परिस्थिती लग्न झाल्यामुळे वातावरण थोडं जड आहे. अशातच अंतर आणि मल्हार एकमेकांना आधीपासूनच पसंत करत नसतात. त्यामुळे त्यांचा हा राग आणखीनच वाढला आहे.तर दुसरीकडे मल्हारची काकी अंतरा आणि तिच्या कुटुंबावर त्यांनी हे लग्न फक्त पैशांसाठी केलं असल्याचा आरोप लावते. त्यामुळे अंतरा आणखीनच दुखावते. आता या सर्वांमध्ये अंतरा आणि मल्हारचं नातं कसं फुलणार पाहणं महत्वाचं ठरेल.
  Published by:Aiman Desai
  First published: