S M L

उद्धट मित्राची कानउघडणी करण्याचा अधिकार आहे, सुखटनकरांचं जितूला समर्थन

काल अभिनेता जितेंद्र जोशीनं दिग्दर्शक सचिन कुंडलकरला चांगलंच फैलावर घेतलं होतं. आता दिग्दर्शक सुनील सुखटनकरांनीही त्यावर पोस्ट टाकलीय.

News18 Lokmat | Updated On: Aug 26, 2018 11:45 AM IST

उद्धट मित्राची कानउघडणी करण्याचा अधिकार आहे, सुखटनकरांचं जितूला समर्थन

मुंबई, 26 आॅगस्ट : विजय चव्हाण यांच्या निधनानंतर सुरू झालेला मामा वाद अजूनही सुरूच आहे. काल अभिनेता जितेंद्र जोशीनं दिग्दर्शक सचिन कुंडलकरला चांगलंच फैलावर घेतलं होतं. आता दिग्दर्शक सुनील सुखटनकरांनीही त्यावर पोस्ट टाकलीय. अभिजात या विशेषणाचा अर्थ ज्यांच्या कलाकृतीकडे पाहून मी समजलो त्या सुनील सुकथनकर आणि सुमित्रा भावे यांच्या विषयी माझ्या मनात अपार आदर आहे. कृपया त्यांना या गलिच्छ अहमहमिकेत आणू नका ही विनंती. असं जितेंद्रनं लिहिलंय.

यावर दिग्दर्शक सुनील सुखटनकरांनी जीतू, अत्यंत योग्य प्रतिक्रिया दिली आहेस. सोशल मीडिया हे एक निर्दय ठिकाण आहे म्हणून कमीत कमी वेळा त्यात प्रतिक्रिया द्यावीशी वाटते, असं म्हटलंय.काय लिहिलंय जितेंद्र जोशीनं?

आज कुंडलकरांची पोस्ट वाचून मी उत्तर दिल्या नंतर अनेक मेसेज, फोन आले परंतु Sunil Sukthankar सरांच्या या प्रतिक्रियेने मी उद्विग्न झालो. ज्या सुमित्रा भावे आणि सुनील सरांनी या कुंडलकर सारख्या अनेक मुलांना घड़वलं/ शिकवलंय;  आज त्यांना निर्बुद्ध प्रतिक्रिया दिल्या जाताहेत. अत्यंत प्रामाणिकपणे , निष्ठेने स्वतःचं काम करणारे हे आदरणीय लोक या सर्व प्रकारात भरडले जाताहेत.

आज एकलव्याने आणि त्याच्या समर्थकाने/ टीकाकाराने द्रोणाचार्यांचा अंगठा मागण्याचे दिवस आले आहेत परंतु या अभिजात दिग्दर्शकद्वयीने जे चित्रपट आणि त्याची समजूत रुजवली ज्यावर मोठे होत कुंडलकरांची कारकीर्द सुरु आहे त्या गुरुजनांना त्याचा त्रास त्यांना होताना मला बघवत नाही. अभिजात या विशेषणाचा अर्थ ज्यांच्या कलाकृतीकडे पाहून मी समजलो त्या सुनील सुकथनकर आणि सुमित्रा भावे यांच्या विषयी माझ्या मनात अपार आदर आहे. कृपया त्यांना या गलिच्छ अहमहमिकेत आणू नका ही विनंती.

Loading...
Loading...

काय लिहिलंय सुनील सुखटनकरांनी?

जीतू, अत्यंत योग्य प्रतिक्रिया दिली आहेस...सोशल मिडिया हे एक निर्दय ठिकाण आहे म्हणून कमीतकमी वेळा त्यात प्रतिक्रिया द्यावीशी वाटते...! पण ओल्या बरोबर सुकं जळतं या न्यायाने तू उल्लेख केलेल्या सुमित्रामावशी किंवा आम्हां काही लोकांचाही सचिनबरोबर उद्धार होतो आणि मग या अदृश्य मैदानात उतरावंसं वाटतं...! मराठी चित्रपट सृष्टी नावाच्या कुटंबातल्या अनेक जाणत्यांशी ‘ दोघी’ च्या वेळे पासून अनपेक्षित संपर्क आला. आपण ते intellectual आणि ही industry mediocre असा भाव आमच्या मनात नव्हता.. म्हणून आमचे चित्रपट वेगळ्या वळणाचे असून या मराठी चित्रपट सृष्टीने आम्हांला प्रेम दिलं... गेल्या काही वर्षांत पत्रकारांच्या पिढ्या बदलल्या.. मार्केटिंग मोठं झालं... आणि सोशल मीडियावर आपापले फड रंगवून क्षणिक लोकप्रियता मिळवण्याचं नवं तंत्र आलं.. त्याभोवती समर्थकांची निकम्मी फौजही निर्माण झाली...त्यामुळे एखाद्याचं निधन हा प्रसंगही, ही चित्रपट सृष्टी किती मूर्ख हे दाखवण्याची संधी म्हणून वापरण्याचा मोह सचिनला झाला.. आणि त्याची री ओढणारेही निघाले.. सचिनच्या समर्थनार्थ निघालेल्या दोन मुद्द्यांचाही समाचार घ्यायला हवा.

मला वाटतं की, तुफान लोकप्रिय कै.विजूमामा आणि वेगळ्या चित्रपट निर्मितीसाठी धडपडणाऱ्या पण तितक्या लोकप्रिय नसलेल्या सुमित्रामावशी या दोघांमधल्या माणसावर प्रेम करणाऱ्या तुला सचिन या आपल्या अनावश्यक उद्धट मित्राची कानउघडणी करण्याचा अधिकार आहे...! सचिन, वेगळा चित्रपट निर्माण करणारे आपण holier than thou आहोत असा समज उगीच निर्माण करण्याची हौस कशासाठी ? तेही लोकांना हसवून- रडवून अकाली चटका लावून गेलेल्या एका उमद्या कलाकाराच्या निधनप्रसंगी ? This definitely is not dignified mourning !!

VIDEO : 'डब्बू अंकल' इज बॅक, मिथुनच्या गाण्यावर तुफान डान्स

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 26, 2018 10:58 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close