काम नाही मिळालं तरी चालेल पण हवालदाराची भूमिका करणार नाही - जितेंद्र जोशी

काम नाही मिळालं तरी चालेल पण हवालदाराची भूमिका करणार नाही - जितेंद्र जोशी

सध्या सेक्रेड गेम्स ही वेबसीरिज चांगलीच गाजतंय. या सीरिजमध्ये अनेक दिग्गज कलाकारांमध्ये एक मराठमोळं नाव आहे. त्याच्या अभिनयाचं खूप कौतुक होतंय.

  • Share this:

मुंबई, 2 सप्टेंबर : सध्या सेक्रेड गेम्स ही वेबसीरिज चांगलीच गाजतंय. या सीरिजमध्ये अनेक दिग्गज कलाकारांमध्ये एक मराठमोळं नाव आहे. त्याच्या अभिनयाचं खूप कौतुक होतंय. तो म्हणजे जितेंद्र जोशी. न्यूज18च्या रिल अॅवाॅर्डमध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून त्याचं नामांकन झालं. त्यावेळी त्यानं आमच्याशी संवाद साधला.

सेक्रेड गेम्समध्ये कशी भूमिका मिळाली?

एका माझ्या मित्रानं मला या आॅडिशनबद्दल सांगितलं. तो म्हणाला पोलिसाची भूमिका आहे. तेव्हा मी नाहीच म्हणालो. कारण अनेक मराठी सिनेमात मी हवालदाराची भूमिका करून कंटाळलोय. पण त्यानं सांगितलं नेटफ्लिक्सचा हा मोठा प्रोजेक्ट आहे. म्हणून मी आॅडिशन दिली आणि विक्रमादित्य मोटवानींनी माझी निवड केली.

#sacredgames #katekar #sartaj

A post shared by jitendra joshi (@jitendrajoshi27) on

सैफ अली खानसोबत काम करताना कसा अनुभव होता?

सैफ खूपच चांगला कलाकार आहे. खूप सहकार्य करणारा आहे. तो धमाल करेल, मजा करेल अशी मी अपेक्षा नव्हती ठेवली. पण मला वेगळा अनुभव आला. मी सैफ आहे असा त्याचा अॅटिट्यूड कधीच नव्हता. मला त्याच्याबरोबरच्या सीन्सची आधी रिहर्सल करायची होती. म्हणून मी त्याच्या घरी गेलो. तर वाचन करता करता मध्येच त्यानं गिटार वाजवायला सुरुवात केली. तो एकदम धमाल आहे. त्याच्याबरोबर कुठल्याही विषयावर चर्चा करता येते.

तू अनेक गोष्टी केल्यास, वर्तमानपत्र वाटण्यापासून ते इलेक्ट्रिशियनपर्यंत. मग अभिनयाकडे कसा वळलास?

माझ्यावर आर्थिक जबाबदारी होती. त्यामुळे इतर गोष्टी कराव्या लागायच्या. पण एक दिवस माझ्या शिक्षकांनी मला बसवून सांगितलं की, तू अभिनयाकडे लक्ष दे. त्यासाठी मी मुंबईत आलो आणि नाटकांत काम करायला लागलो.

तू खूप नाटक, सिनेमे केलेत, वेबसीरिजसाठीचं काम कसं वाटलं?

हे माध्यम खूप प्रभावी आहे. तुमच्या शेजारी बसलेला माणूस स्मार्टफोनवर तुमची सीरिज बघत असतो. सिनेमे थोडे आठवडे राहतात. पण नेटफ्लिक्सवर सेक्रेड गेम्स कायमच राहील.

काटेकरला खूप लोकप्रियता मिळाली. तुला टाइपकास्ट व्हायची भीती वाटतेय का?

त्यानंतर अनेकांनी मला हवालदाराच्या भूमिकेबद्दल विचारलं. पण मी कामाशिवाय राहीन, पण पुन्हा हवालदार करणार नाही. तुमच्यातलं वैविध्य प्रेक्षकांपर्यंत आणि फिल्ममेकर्सपर्यंत पोचवणं तुमची जबाबदारी असते.

सेक्रेड गेम्सनंतरचं आयुष्य कसं आहे?

हिंदी फिल्म इंडस्ट्रीसाठी माझा चेहरा नवा आहे. काही फिल्ममेकर्स मला  विचारतायत, चर्चा सुरू आहेत. पण अजून ठोस काही झालं नाही.

PHOTOS : 'ही' अभिनेत्री घेणार 'शनाया'ची जागा !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2018 10:35 AM IST

ताज्या बातम्या