Home /News /entertainment /

लॉकडाऊनचे अनुभव Facebook Live वरून सांगताना जितेंद्र जोशी का झाला भावुक? पाहा VIDEO

लॉकडाऊनचे अनुभव Facebook Live वरून सांगताना जितेंद्र जोशी का झाला भावुक? पाहा VIDEO

'मी मुद्दामच चांगल्या पदार्थांचे फोटो पोस्ट करत नाही... ' जितेंद्रच्या मनमोकळ्या, दिलखुलास, अनौपचारिक व्हर्च्युअल गप्पा ऐकायला हा व्हिडीओ पाहा

    मुंबई, 22 एप्रिल : अभिनेता, कवी, गीतकार, सादरकर्ता, मुलाखतकार अशा विविध रुपांत भेटणारा मनस्वी कलाकार जितेंद्र जोशी आज News18lokmat.com च्या Facebook LIVE मध्ये सहभागी झाला होता. या माध्यमातून त्याने त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला. वाचकांनी आणि यूजर्सनी थेट त्यांच्या लाडक्या जितूला प्रश्न विचारले. सर्वाधिक विचारला गेलेला प्रश्न होता... लॉकडाऊनमध्ये तुम्ही घरी काय काय करता? या प्रश्नाचं उत्तर देताना जितेंद्रने आपण घरीच आहोत, काळजी घेत आहोत, असं सांगितलं. घरात काम करतो. स्वयंपाकसुद्धा करतो असं सांगितलं. "पण मी काय काय पदार्थ करतो हे रंगवून सांगणार नाही. सोशल मीडियावर मी मुद्दामच चांगलं-चुंगल्या पदार्थांचे फोटो पोस्ट करत नाही. आपल्या भोवताली, आसपास अनेक लोक आज असे आहेत, ज्यांना पोटभर खायलाही मिळत नाही. आपल्या देशात असे अनेक जण आहेत", हे सांगताना जितेंद्र भावुक झाला. आपल्याला राहायला घर आहे, त्यामुळे कंटाळा आला का हा प्रश्न बरोबर नाही. ज्यांना स्वतःचं घरही नाही त्यांचं काय... असा प्रश्न करून जितेंद्रने अनेकांना अंतर्मुख केलं. सुमारे तासभर मनमोकळ्या आणि अनौपचारिक गप्पा मारताना त्यानं त्याचं घरही दर्शकांना दाखवलं. पुन्हा कवितांकडे लॉकडाऊन संपल्यावर पहिल्यांदा काय करणार या प्रश्नावर जितेंद्रने सांगितलं, "पहिलं पवई पोलीस ठाण्यात जाणार." पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत जितेंद्रचं घर आहे. पोलीस या साथीच्या काळात जे काम करत आहेत, त्यांना धन्यवाद द्यायला पहिलं जाणार, असं जितेंद्रने सांगितलं सध्या घरात आहे, तर नवीन काही पुस्तक वाचताय काय या प्रश्नावर जितेंद्र म्हणाला, सध्या पुन्हा कवितेकडे वळलो आहे. बा. भ. बोरकरांच्या कविता वाचतोय. नवीन काय शिकलात? नवीन दोन डिशेस करायला शिकलो, असं म्हणून मुलीला विचारलं. जितेंद्रची मुलगी रेवा हिनेसुद्धा बाबा कुठले पदार्थ छान करतो, हे यूजर्सना सांगितलं. नूडल्सचे वेगवेगळे प्रकार सध्या करतो आहे, असं जितेंद्र म्हणाला. जितेंद्रच्या मनमोकळ्या, दिलखुलास, अनौपचारिक व्हर्च्युअल गप्पा ऐकायला हा व्हिडीओ पाहा
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या