S M L

जगाला याडं लावलंय 'जिमकी कमल'ने, तुम्ही ऐकलं का ?

'जिमकी कमल' हे गाणं 'वेलीपडीनेट पुष्ठकम' या मल्याळम सिनेमातलं आहे.

Sachin Salve | Updated On: Oct 28, 2017 05:20 PM IST

जगाला याडं लावलंय 'जिमकी कमल'ने, तुम्ही ऐकलं का ?

27 आॅक्टोबर :  अवघ्या जगाला वेड लावलेल्या 'कोलावरी डी' गाण्यानंतर आता आणखी एका टाॅलिवूड इंडस्ट्रीतील गाण्याने गारूड घातलंय. 'जिमकी कमल' असं या मल्याळम गाण्याचं नाव आहे. या गाण्याने टाॅलीवूडमध्ये तर धुमाकूळ घातलायच पण जगाच्या कानाकोपऱ्यात जिमकी कमलवर लोकं थिरकताय.

'जिमकी कमल' हे गाणं 'वेलीपडीनेट पुष्ठकम' या मल्याळम सिनेमातलं आहे.  सुपरस्टार मोहनलाल यांची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे. मागील महिन्यात 31 आॅगस्टला हा सिनेमा रिलीज झालाय. पण, या सिनेमातील 'जिमकी कमल' या गाण्याने लोकांना अक्षरश: 'याड' लावलंय. लग्न असो, आॅफिस असो, काॅलेज असो प्रत्येक ठिकाणी जो तो या गाण्यावर थिरकतोय. युट्यूबवर जर तुम्ही 'जिमकी कमल' नुसतं सर्च केलं तर लाखो व्हिव्हज मिळवलेले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील.आॅफिसमध्ये कर्मचारी या गाण्यावर ठेका धरून आपल्या व्हिडिओ युट्यूबव शेअर केलाय तर अरब, स्पेन, अमेरिकेतही जिमकी कमलवर थिरकून व्हिडिओ शेअर केले जात आहे. एवढंच काय तर मराठीतही तुम्हाला हे गाणं पाहायला मिळेल.

तुम्हाला जर मल्याळम भाषा येत असेल तर साहजिक या गाण्याचे बोल समजतील. पण जर तुम्हाला माहिती नसेल तर या गाण्याचे बोल समजणे जरा अवघडच होईल. पण एक मात्र खात्री आहे हे गाणं तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही परत परत हे गाणं ऐकणार. या गाण्याचे पहिल्या कडव्याचे बोल हे  "माझ्या आईचे झुमके, माझ्या वडिलांनी चोरले, मग माझ्या वडिलांची ब्रँडीची बाटली, माझ्या आईने संपवली" असा काहीस आहे.

Loading...
Loading...

अलीकडे या गाण्यावर लोकप्रिय आरजे मलिष्काही या गाण्यावर थिरकली होती. तिच्या टीमने या गाण्याला महाराष्ट्रीयन तडका दिलाय. तर या गाण्याचं मराठी, तमिळ असे अनेक व्हर्जन पाहायला मिळताय. पण एकंदरीतच काय तर संगीत आणि कलेला कोणत्याही सीमा आणि भाषेची गरज नसते. ती सादर होते, पाहिली जाते आणि मनाला तृप्त करते.

========================

========================

रेट्रो एफएम आरजे टीमचं धारावी स्टाईल 'जिमकी कमल'

========================

=====================

=====================

'जिमकी कमल' रशियन तडका

=====================

आॅस्ट्रेलियात 'जिमकी कमल'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 28, 2017 05:20 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close