Home /News /entertainment /

जिया खानच्या आईचा #CBIForSSR ला पाठिंबा, म्हणाल्या- माझ्या मुलीप्रमाणे सुशांतला देखील मारलं

जिया खानच्या आईचा #CBIForSSR ला पाठिंबा, म्हणाल्या- माझ्या मुलीप्रमाणे सुशांतला देखील मारलं

बॉलिवूड अभिनेत्री जिया खानची आई राबिया खान यांनी देखील सुशांत मृत्यू प्रकरणाची तपासणी सीबीआयने करावी या मागणीला पाठिंबा दिला.

    मुंबई, 14 ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूत प्रकरणी (Sushant Singh Rajput Case) सीबीआयने आरोपपत्र दाखल केले असले तरीही रिया चक्रवर्तीने (Rhea Chakraboty) दाखल केलेल्या याचिकेनंतर आता निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा असेल. या घटनेचा तपास कोण करेल याबाबत सर्वोच्च न्यायालय निर्णय देईल. यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा या प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. बॉलिवूड अभिनेत्री जिया खान (Jiah Khan) ची आई राबिया खान (Rabia Khan) यांनी देखील सुशांत मृत्यू प्रकरणाची तपासणी सीबीआयने करावी या मागणीला पाठिंबा दिला आहे. त्यांनी सुशांतच्या मृत्यूला आत्महत्या नाही तर हत्या म्हटले आहे. त्या असे म्हणाल्या की ज्याप्रमाणे त्यांची मुलगी जियाच्या मृत्यूला आत्महत्येचे स्वरूप दिले होते, तसेच सुशांतच्या केसमध्येही होत आहे. सुशांतला न्याय मिळावा याबाबत भाष्य करणारी पोस्ट राबिया खान यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, 'मला यापेक्षा जास्त असहाय्य आणि उदास कधीच वाटले नव्हते, ज्याप्रकारे जियाला मारण्यात आले तसेच सुशांतबरोबर देखील झाले आहे. सुशांत आणि जियाला सुरुवातीला खोटे अटेन्शन आणि प्रेम देण्यात आले. जेव्हा दोघेही नार्सिसिस्ट सायकोपाथ गॅस लाइटनिंग पार्टनरच्या जाळ्यात अडकले, तेव्हा त्यांना शारिरीक त्रास आणि शिवीगाळ करण्यात आली''. हे वाचा-'आम्हाला सुशांतच्या कुटुंबीयांइतकीच काळजी', SSR प्रकरणात संजय राऊतांचा यू-टर्न त्यांनी या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, 'दोघांचाही पैशांसाठी वापर करण्यात आला आणि त्यांना परिवारापासून दूर करण्यात आले. दोघांनाही- जिया आणि सुशांतला मानसिक रुग्ण बोलण्याता आले आणि काम नसल्यामुळे ते नैराश्यात असल्याचे सांगण्यात आले.' राबिया खान यांनी असा आरोप केला आहे की, जिया खान आणि सुशांत यांचे पार्टनर्स शक्तिशाली बॉलिवूड माफिया आणि नेतेमंडळींशी जोडलेले आहेत. त्याचप्रमाणे राजकीय दबावामुळे पोलिसांसमोर सत्य येत नसल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. राबिया खान यांनी असे म्हटले आहे की, पोलिसांनी त्यांचा संपूर्ण वेळ पुरावे नष्ट करण्यासाठी आणि या होमिसाइडल डेथला आत्महत्या दाखवण्यासाठी घालवला आहे. हे वाचा-#CBIforSSR: सुशांतच्या बहिणीपाठोपाठ या बॉलिवूड कलाकारांनी केली CBI चौकशीची मागणी त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, 'लोकांच्या मनामध्ये संशय निर्माण करण्यासाठी हे गुन्हेगार पीडित कुटुंबातील मुलांवर पैशांच्या लालसा, बेजाबदारपणे झालेली वाढ अशाप्रकारे आरोप करून हल्ला करतात. सीबीआयने या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास करणे गरजेचे आहे आणि अपराध्यांना शिक्षा सुनावली पाहिजे. नाहीतर ते हैवान बनून त्यांचे कुकर्म काही पटींनी वाढेल आणि त्यामुळे आणखी काहींचा बळी जाईल. जिया, सुशांत आणि दिशा एखाद्या अपघातामुळे त्यांनी भोगले नाही तर नेते, पोलीस आणि बॉलिवूड माफिया अपराध्यांना सुरक्षा देतात, पीडित परिवाराला भीतीने जगण्यासाठी प्रवृ्त्त करतात, यामुळे त्यांनी भोगले आहे. याप्रकारचे गुन्हे संपायला हवे.' राबिया खान यांची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
    First published:

    Tags: Sushant sing rajput

    पुढील बातम्या