जिया खान आत्महत्येप्रकरणी सूरज पांचोलीवर आरोप निश्चित

भारतीय दंडविधान ३०६ अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या आरोपाखाली हा खटला चालवण्यात येणार आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 30, 2018 07:59 PM IST

जिया खान आत्महत्येप्रकरणी सूरज पांचोलीवर आरोप निश्चित

30 जानेवारी : बाॅलिवूडची अभिनेत्री जिया खान हिच्या आत्महत्या प्रकरणात अभिनेता सूरज पांचोली याच्या विरोधात मुंबईतील सेशन्स कोर्टाने आरोपनिश्चिती केली आहे. भारतीय दंडविधान ३०६ अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या आरोपाखाली हा खटला चालवण्यात येणार आहे. सूरजनं मात्र आपण दोषी नसल्याचा दावा केला आहे. या प्रकरणात आता १४ फेब्रुवारीपासून साक्षीदारांची तपासणी होणार आहे.

जिया खान हिनं ३ जून २०१३ रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यापूर्वी दोन दिवस आधी ती सूरज पांचोलीच्या घरी राहात होती असं दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात म्हणण्यात आलं आहे.

सीबीआयच्या म्हणण्यानुसार, सूरजनं या प्रकरणील माहिती दडवली होती तसंच खोटी माहिती दिली होती. जियाची आई राबिया खान हिनं आॅक्टोबर २०१३ साली मुंबई हायकोर्टात धाव घेत आपल्या मुलीचा खून झाला असल्याचा दावा करत सीबीआय चौकशीची मागणी केली, जी कोर्टानं मान्य केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 30, 2018 07:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...