• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • Jhimma movie: 7 अभिनेत्रींनी घेतला ठाव! 'झिम्मा'च्या नव्या गाण्यानं जिंकलं मन

Jhimma movie: 7 अभिनेत्रींनी घेतला ठाव! 'झिम्मा'च्या नव्या गाण्यानं जिंकलं मन

‘झिम्मा’ चित्रपटाचं काही दिवसांपूर्वीच शीर्षक गीत प्रदर्शित झाले आणि प्रेक्षकांनी त्याला तुफान प्रतिसाद दिला. सोशल मीडियावर हे गाणे धुमाकूळ घालत असतानाच या चित्रपटातील आणखी एक गाणे प्रदर्शित झाले आहे.

  • Share this:
    मुंबई 2 नोव्हेंबर : गेल्या काही काळापासून मराठी सिनेरसिक 'झिम्मा' चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा'चा आंतरराष्ट्रीय महिला दिनीच टिझर प्रदर्शित झाला होता. परंतु, त्यानंतर कोरोना महामारीने डोके वर काढले आणि प्रदर्शनाची तारीख पुढे गेली. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचे शीर्षक गीत प्रदर्शित झाले आणि प्रेक्षकांनी त्याला तुफान प्रतिसाद दिला. सोशल मीडियावर हे गाणे धुमाकूळ घालत असतानाच या चित्रपटातील आणखी एक गाणे प्रदर्शित झाले आहे. झिम्मा चित्रपटाचे शिर्षक गीत प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. आता या चित्रपटातील 'माझे गाव' हे अतिशय वेगळ्या धाटणीचे गाणे सोशल मीडियावर चर्चेत आहे. हे गाणे अपेक्षा दांडेकर हिने गायले असून गाण्याला अमितराज यांचे संगीत आहे. 'कुठल्या नभाच्या पार आहे माझे गाव' असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याची एक वेगळी जादू असून गाणे एकदा कानावर पडले की रसिक गुणगुणल्याशिवाय राहत नाही. वाचा : बिग बॉस मराठीमध्ये टीम्स करतायेत प्लॅनिंग...; कोणाचा होणार ''डब्बा गुल'' महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहांमध्ये 19नोव्हेंबरला ‘झिम्मा’ चित्रपट प्रदर्शित होत आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा' चित्रपटाचा विषय वेगळ्या धाटणीचा आहे. वेगवेगळ्या वयाच्या आणि वेगवेगळी पार्श्वभूमी असलेल्या स्त्रिया काही काळ जबाबदाऱ्या बाजूला ठेवतात आणि मनमुराद जगण्यासाठी इंग्लंडला जातात. मग तिकडे काय धम्माल होते, हे प्रेक्षकांना झिम्मा'मधून पाहायला मिळणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील तगडी स्टारकास्ट 'झिम्मा'मध्ये दिसणार आहे. सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, सोनाली कुलकर्णी, क्षिती जोग, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. त्यामुळे सिनेसृष्टीतील वेगळ्या धाटणीच्या सात अभिनेत्री एकाच चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. वाचा : Ex बॉयफ्रेंडचं नाव निघताच अभिनेत्रीला कोसळलं रडू ; Video होतोय व्हायरल या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून छायाचित्रीकरण संजय मेमाणे यांचे आहे. तर क्षिती जोग यांच्यासोबत स्वाती खोपकर, अजिंक्य ढमाळ, उर्फी काझमी, विराज गवस, सनी शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यामुळे मराठी सिनेरसिकांसाठी 'झिम्मा' हा चित्रपट पर्वणीच ठरणार आहे.
    Published by:News18 Trending Desk
    First published: