मुंबईत हॉटेलमध्ये भांडे धुणाऱ्या मुलाला Indian Idolने बनवलं स्टार!

मुंबईत हॉटेलमध्ये भांडे धुणाऱ्या मुलाला Indian Idolने बनवलं स्टार!

हॉटेलवर भांडी घासत असतानाच तो गाण्याचीही प्रॅक्टीस करत होता. आणि एक दिवस त्याचं ते स्वप्न पूर्ण झालं.

  • Share this:

मुंबई 8 नोव्हेंबर : कधी कुणाचं आयुष्य पालटेल ते काही सांगता येत नाही. छोट्या पडद्यावरच्या 'रिअ‍ॅलिटी शो'मुळे अनेकांचं आयुष्य बदलून गेलं. काही महिन्यांपूर्वी रेल्वे स्टेशनवर गाणं गात पोट भरणाऱ्या रानू मंडल यांच्या गाण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्या रातोरात स्टार झाला. आता रानू यांची एन्ट्री बॉलिवूडमध्ये झालीय. गेली अनेक वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीस उतरलेला कार्यक्रम म्हणजे Indian Idol. या कार्यक्रमातूनही अनेक तरुणांना व्यासपीठ मिळालं होतं. आताही Indian Idolने आणखी एका मुलाला स्टार बनवलंय. तो स्टार आहे दिवस नायक (Divas Nayak). मुंबईत CSTM स्टेशन (Chhatrapati Shivaji Terminus) जवळच्या एका हॉटेलमध्ये काम करणारा नायकचे दिवस आता पालटले असून तो 'स्टार' झालाय.

मराठीतल्या 'या' अभिनेत्रीला हॉलिवूडची ऑफर, पाहा काय म्हणाली

दिवसची Indian Idolच्या 30 स्पर्धकांमध्ये निवड झाली होती. पहिल्याच ऑडिशनपासून तो परिक्षकांच्या आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. अतिशय सुरेल आवाज आणि चेहेऱ्यावरची निरागसता यामुळे दिवसने सगळ्यांच्या मनात घर केलं होतं. मात्र दिवसची Indian Idolच्या फायनल स्पर्धकांमध्ये निवड होऊ शकली नाही. मात्र त्याची मुंबईत येण्याची कहाणी होती ती सगळ्यांनाच प्रेरणा देणारी आहे.

मुळचा झारखंडचा असणारा दिवस केवळ गाण्यावरचं प्रेम आणि मायानगरी मुंबईच्या आकर्षणामुळे झारखंडमधल्या खेड्यातून मुंबईत आला. तो सीएसटीएम जवळच्या हॉटेलात काम करू लागला. आणि एक दिवस त्याच्या प्रयत्नांना यश मिळून तो Indian Idolमध्ये निवडला गेला. त्याची फायनलमध्ये निवड झाली नसली तरी त्याच्या प्रयत्नांना सगळ्यांनीच दाद दिलीय. कार्यक्रमाच्या परिक्षक नेहा कक्कड यांनी त्याला घरी परत जाण्यासाठी 1 लाख रुपये दिले होते आणि विमानाने प्रवास करण्यास सांगितले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल KBC चा माफीनामा, पाहा VIDEO

दिवस जेव्हा विमानाने झारखंडमधल्या आपल्या गावी पोहोचला तेव्हा त्याचं हिरो सारखं स्वागत करण्यात आलं होतं. या स्वागताने दिवस भारावून गेलाय. Indian Idolने प्रसिद्धी मिळाल्यामुळे त्याला आता मुंबईत नोकरीही लागलीय. हिंदुजा हॉस्पिटमध्ये त्याला अटेंडंटची नोकरी लागलीय. पण जोपर्यंत एक चांगला गायक बनणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही असंही त्याने स्पष्ट केलंय.

First published: November 8, 2019, 5:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading