Home /News /entertainment /

'झाँसी की रानी' फेम अभिनेत्रीने दिला लेकीला जन्म, थंगबली बनला बाबा!

'झाँसी की रानी' फेम अभिनेत्रीने दिला लेकीला जन्म, थंगबली बनला बाबा!

मनोरंजन सृष्टीतून एक गुड न्यूज समोर आली आहे. टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री (Tv Actress) कृतिका सेंगर (Kratika Sengar) आणि निकितिन धीर (Nikitan Dheer) आईबाबा बनले आहेत. अभिनेत्रीने नुकतंच एका गोंडस लेकीला जन्म दिला आहे.

  मुंबई,12 मे- मनोरंजन सृष्टीतून एक गुड न्यूज समोर आली आहे. टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री (Tv Actress) कृतिका सेंगर (Kratika Sengar) आणि निकितिन धीर (Nikitan Dheer) आईबाबा बनले आहेत. अभिनेत्रीने नुकतंच एका गोंडस लेकीला जन्म दिला आहे. काही महिन्यांपूर्वी या सेलिब्रेटी कपलने आपण पालक होणार असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. त्यांनतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला होता. नुकतंच पापाराझी विरल भयानीने या सेलिब्रेटी कपलला मुलगी झाल्याची माहिती शेअर केली आहे. चाहते या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. बॉलिवूड चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारे आणि महाभारतात कर्णाची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते पंकज धीर, निकितन आणि कृतिका यांच्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे.कारण अभिनेते पंकज आजोबा बनले आहेत.तर कृतिका आणि निकितन आईबाबा बनले आहेत. कृतिकाने पती निकितनसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपण प्रेग्नेंट असल्याची माहिती दिली होती. कृतिका सेंगरला कोणत्याही ओळखीची गरज नाही. अनेक मालिकांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने तिने प्रेक्षकांमध्ये एक खास ओळख निर्माण केली आहे. काही महिन्यांपूर्वी कृतिकाने निकितन धीरसोबतचा एक फोटो शेअर केला होता. आणि कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, 'धीर ज्युनियर 2022 मध्ये येणार आहे. हर हर महादेव ओम'. या पोस्टवर बॉलिवूड आणि टीव्हीच्या प्रसिद्ध अभिनेत्रीनीं तिचं अभिनंदन केलं होतं. अनिता राज, अंकिता लोखंडे, गौहर खान, किश्वर मर्चंट, स्मृती खन्ना, अक्षरा सिंग, रिद्धिमा पंडित यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी कृतिका आणि निकितनचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.
  'राणी लक्ष्मीबाई'ची भूमिकेसाठी कृतिका सेंगरला खूप वाह-वाह मिळाली होती. तिने 'पुनर्विवाह', 'कसम तेरे प्यार की', 'छोटी सरदारनी' सारख्या टीव्ही शोमध्ये काम केले आहे. तर पती अभिनेता निकितन धीर हे सुप्रसिद्ध कलाकार आणि चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक पंकज धीर यांचे पुत्र आहेत. निकितन 'दबंग 2', 'रेड्डी' या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. पण निकितनला शाहरुख खानच्या सुपरहिट चित्रपट 'चेन्नई एक्सप्रेस'मधून प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. या चित्रपटात खलनायक थंगबलीची भूमिका साकारून निकितनं खूप लोकप्रियता मिळवली होती.निकितन आणि कृतिका यांचे २०१४ साली लग्न झाले होते.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bollywood actor, Entertainment, Tv actress

  पुढील बातम्या