मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Jethalal: 'तारक मेहता...'मधून का गायब आहेत जेठालाल? समोर आलं कारण

Jethalal: 'तारक मेहता...'मधून का गायब आहेत जेठालाल? समोर आलं कारण

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. गेली 14 वर्षे ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. गेली 14 वर्षे ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. गेली 14 वर्षे ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 15 सप्टेंबर-  'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. गेली 14 वर्षे ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक वयोगटातील लोक या मालिकेचे चाहते आहेत. या मालिकेतून प्रत्येक कलाकाराला एक खास ओळख मिळवून दिली आहे. त्यातील एक अभिनेते म्हणजे दिलीप जोशी होय. दिलीप जोशींनी जेठालालची भूमिका साकारत प्रेक्षकांना वेड लावलं आहे. परंतु सध्या ते मालिकेतून गायब दिसत आहेत. त्यामुळे चाहते निराश झाले आहेत. पाहूया काय आहे नेमकं कारण.

गेल्या काही महिन्यांत 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये अनेक बदल पाहायला मिळाले होते. मालिकेतील अनेक स्टार कलाकारांनी मालिकेला रामराम केलं आहे. मालिकेत तारक मेहता ही मुख्य भूमिका साकारणारे शैलेश लोढा शो सोडून गेल्याने प्रेक्षक दु:खी झाले आहेत. तसेच मालिकेच्या शेवटच्या काही भागांमध्ये जेठालालसुद्धा गायब दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना त्यांनीसुद्धा मालिका सोडली की काय? अशी चिंता वाटू लागली आहे. परंतु जेठालाल मालिकेतून का गायब आहेत याचं कारण आता समोर आलं आहे.

'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या मालिकेच्या अनेक प्रेक्षकांना असं वाटत आहे की, निर्माते आता तारक मेहतानंतर जेठालालला रिप्लेस करण्याच्या तयारीत आहेत. यामुळे काही प्रेक्षक शोच्या निर्मात्यांना इशारा देत आहेत. परंतु सत्य हे आहे की दिलीप जोशी अर्थातच ​​जेठालालने ही मालिका सोडलेली नाहीय. त्यांनी काही दिवसांची सुट्टी घेतली आहे. सध्या ते विदेशात व्हेकेशनचा आनंद घेत आहेत.

(हे वाचा:Shailesh Lodha : तुम्ही शेवटचे खरं कधी बोलला होतात?'; शैलेश लोढा यांनी थेट साधला असित मोदींवर निशाणा )

दिलीप जोशी सध्या अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये व्हेकेशनचा आनंद घेत आहेत. नुकतंच दिलीप जोशींनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर, आपल्या ट्रिपची झलकही दाखवली आहे. तेथील एका उद्यानाचा फोटो शेअर करत दिलीप जोशी यांनी लिहलंय, 'एखाद्याच्या मुळांचा आदर करायला शिकत आहे.' ते सेक्वॉइया नॅशनल पार्कमधील नैसर्गिक सौंदर्याचा आनंद लुटताना दिसत आहेत.सध्या हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

First published:

Tags: Entertainment, Tarak mehta ka ooltah chashmah, Tv actor