मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अ‍ॅमेझॉनच्या सीईओंसाठी शाहरुख खानने बदलला त्याचा सुपरहिट डायलॉग

अ‍ॅमेझॉनच्या सीईओंसाठी शाहरुख खानने बदलला त्याचा सुपरहिट डायलॉग

    दिल्ली,17 जानेवारी: अभिनेता शाहरूख खान आणि  अ‍ॅमेझॉन डॉट कॉमचे संस्थापक  जेफ बेजोस (Jeff Bezos)यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जेफ बेजोस हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांनी दिल्लीमध्ये छोट्या तसच मध्यम व्यवसायिकांसाठी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. 'अ‍ॅमेझॉन संभव' असं या कार्यक्रमाचं नाव आहे. या कार्यक्रमात जेफ आणि शाहरूख या दोघांमध्ये गमतीशीर संवाद झाला.  यावेळी किंग खानने त्याच्या 'डॉन' चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग म्हटला आणि जेफ यांनाही तो डायलॉग बोलण्यास सांगितला. पण हा डायलॉग मोठा चर्चेचा विषय झाला आहे कारण शाहरूख खानने जेफ यांच्यासाठी त्याचा डायलॉग बदलून तो वेगळ्या अंदाजात म्हटला आहे. जेफ यांनी केलं शाहरूख खानचं कौतुक डॉन चित्रपटातला शाहरूखचा गाजलेला डायलॉग आहे 'डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं,नामुमकिन है' आणि याच डायलॉग मध्ये बदल करून शाहरूख म्हणाला 'जेफ को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है'. तर असा हा बदलेला  डायलॉग म्हणताना तो म्हणण्याचा अंदाजही  वेगळा होता.  बदललेला डायलॉग आणि शाहरूकची सादर करण्याची पद्धत त्यामुळे कार्यक्रमात  एकच हशा पिकला. या कार्यक्रमात  जेफ यांनी किंग खानचं भरभरून कौतुक केलं. शाहरूख एक अत्यंत नम्र व्यक्ती आहे असं जेफ म्हणाले. जेफ यांनी केलेल्या या कौतुकावर बोलताना 'ये मेरी फिल्में न चलने का नतीजा है' असं शाहरूखनं म्हटलंय. शाहरूख आणि जेफ यांच्यातील मिश्किल संवादाने उपस्थितांचं चांगलच मनोरंजन केलं. जेफ यांनी या कार्यक्रमात  गुंतवणूकीबाबत एक मोठी घोषणा केली आहे.  भारतात एक अब्ज डॉलर गुंतवणूक करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनीही हजेरी लावली. शाहरूख खान, रितेश देशमुख, जोया अख्तर, फरहान अख्तर, विद्या बालन, कमल हसन आणि जेनेलिया डिसूजा या सिनेकलाकारांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या