मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

कडक VIDEO : अंतरा फेम योगिता चव्हाणचा लयभारी डान्स पाहिला का?

कडक VIDEO : अंतरा फेम योगिता चव्हाणचा लयभारी डान्स पाहिला का?

जीव माझा गुंतला (jeeva maza guntala) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिया मालिकेपैकी एक मालिका आहे.मालिकेत साधीभोळी दिसणारी अंतरा म्हणजे योगिता चव्हाण ( yogita chavhan) खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 18 नोव्हेंबर- जीव माझा गुंतला (jeeva maza guntala) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिया मालिकेपैकी एक मालिका आहे. या मालिकेतील अंतरा आणि मल्हारची जोडी प्रेक्षकांच्या आवडती जोडी आहे. या मालिके अंतर रिक्षा चालवून तिच्या कुटुंबाचे पालन करताना दिसत आहे. लग्नानंतर मात्र तिला आता नवीन संकटाना तोंड द्यावे लागत आहे. मालिकेत साधीभोळी दिसणारी अंतरा म्हणजे योगिता चव्हाण ( yogita chavhan) खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड आहे. अंतराला डान्सची आवड आहे. अनेकदा सोशल मीडियावर डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते. सध्या तिचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

योगिताने तिचा हा डान्स व्हिडीओ इन्स्टावर पोस्ट केला आहे. तिच्या या डान्स व्हीडीओवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे. एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, Serial madhye भांडा आणि इथे नाचा 😂, तर दुसऱ्याने म्हटलं आहे की,वा झकास, तर आणखी एकाने कडक ..असं म्हटलं आहे.लईच भारी राव ...!!!!, पेटल्यास की...अशा अनेक कमेंट तिला आल्या आहेत. आतापर्यंत 30 हजारापेक्षा जास्त लोकांनी हा व्हि़डीओला लाईक केले आहे.

वाचा : 'तुझ्या माझ्या..' : अदिती- सिद्धार्थच्या आयुष्यात आलेली ही नवीन व्यक्ती कोण?

'जीव माझा गुंतला' ही कलर्स वाहिनीवरील मराठी मलिका अल्पावधीतचं प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेने अंतरा म्हणजेच योगिताला रसिक प्रेक्षकांचं भरभरून प्रेम दिल आहे. या मालिकेने योगिताला एक नवी ओळख मिळवून दिली आहे. मूळच्या ठाण्याच्या असणाऱ्या योगिताची मुख्य अभिनेत्री म्हणून ही पहिलीच मालिका आहे.

याआधी योगिताने बापमाणूस, जाडूबाई जोरात, नवरी मिळे नवऱ्याला अशा मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत. तसेच भाकरवाडी या हिंदी मालिकेमध्येही काम केलं आहे.तसेच योगिता चव्हाणने 2018 मध्ये मराठी चित्रपट 'गावठी' मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. आज या मालिकेने योगिताला अभिनय क्षेत्रात एक वेगळं स्थान मिळवून दिल आहे.जीव माझा गुंतला मालिकेमध्ये सध्या अंतरा आणि मल्हारचं लग्न झालेलं असून. या दोघांमध्ये सतत वादावादी होत आहेत. या दोघांमध्ये प्रेमाची कळी कधी उमलणार याकडे रसिक प्रेक्षकांचं मन लागलं आहे.

First published:

Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment