Home /News /entertainment /

मराठी मनोरंजनसृष्टीत शोककळा; 'जीव झाला येडापिसा'मधील अभिनेत्याचं कोरोनामुळं निधन

मराठी मनोरंजनसृष्टीत शोककळा; 'जीव झाला येडापिसा'मधील अभिनेत्याचं कोरोनामुळं निधन

मराठीतील प्रसिद्ध मालिका (Marathi Serial) ‘जीव झाला येडा पिसा’(Jeev Zala yedaPisa) मध्ये ‘भावे’ (Bhave) ही व्यक्तिरेखा साकारणारे ज्येष्ठ अभिनेता हेमंत जोशी(Hemant Joshi Death) याचं कोरोनाने निधन झालं

  मुंबई, 21 मे-  कोरोना(Coronavirus)  बळींचं चक्र काही थांबताना दिसत नाहीय. एका पाठोपाठ एक लोकांना कोरोनामुळे आपल्या आयुष्याला मुकावं लागत आहे. सर्वसामान्य लोक असो किंवा कलाकार सर्वांनाचं कोरोनाचा फटका बसत आहे. नुकताच मराठीतील प्रसिद्ध मालिका (Marathi Serial) ‘जीव झाला येडा पिसा’(Jeev Zala yedaPisa) मध्ये ‘भावे’ (Bhave) ही व्यक्तिरेखा साकारणारे ज्येष्ठ अभिनेता हेमंत जोशी(Hemant Joshi Death)  याचं कोरोनाने निधन झालं होतं. याबद्दलची भावुक पोस्ट करत अभिनेत्री सुमेधा दातारने (Sumedha Datar)  म्हटलं,’भावपूर्ण श्रद्धांजली, असं लिहायला मनचं धजत नाहीय’, पाहूया काय आहे सुमेधाची पोस्ट.
  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः सर्वांना हादरून सोडलं आहे. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे मृतांची. 19 मे ला हेमंत जोशी या अभिनेत्याचं कोरोनामुळे निधन झालं होतं. त्यांनी कलर्स मराठीवरील प्रसिद्ध मालिका ‘जीव झाला येडा पिसा’ मध्ये ‘भावे’ ही भूमिका साकारली होती. ते अत्यंत दिलखुलास स्वभावाचे होते. सेटवर ते नेहमी हसत खेळत असायचे.त्यांचा हा मनमौला अंदाज सगळ्यांनांच भावत होता. त्यांच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्या सह कलाकारांना विश्वासचं बसत नाहीय. (हे वाचा:Versace Baby गाण्यातून धुमाकूळ घालणाऱ्या उर्वशी रौतेलाचा ग्लॅमरस अंदाज) जीव झाला येडा पिसा मध्ये ‘विजया काकी’ ची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुमेधा दातारने आपल्या इन्स्टाग्रामवर हेमंत यांचा फोटो शेयर करत अत्यंत भावुक पोस्ट लिहली आहे. सुमेधाने पोस्टमध्ये लिहिलं आहे, ‘"भावपूर्ण श्रद्धांजली" असं लिहायला मनच धजत नाहीयेहे दिलखुलास हास्य ,ही एव्हरग्रीन पर्सनॅलिटीसतत हसतमुख व्यक्तिमत्त्वकसे आहात विचारलं की स्टायलित उत्तर एकच ..."ऐश" माझ्या आयुष्यातील पहिलं प्रोफेशनल रेकॉर्डिंग मी हेमंत जोशींबरोबर केलं, तिथपासून जीव झाला येडापिसा पर्यंतचा प्रवास...आणि काल अचानक भावे गेले ...किती वेळ, अजूनही पटतच नाहीये जिथे कुठे असाल तिथे तुमच्या भाषेत "ऐश" करा’ अशा आशयाची ही पोस्ट लिहत सुमेधाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (हे वाचा:VIDEO: 'हम दिल दे चुके सनम'; पाहा गौतमी देशपांडेचा सुरेल अंदाज) हेमंत जोशीसारख्या दिलखुलास अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Coronavirus, Instagram post, Marathi actress, Marathi entertainment

  पुढील बातम्या