मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Jeev Maza Guntla : अंतराने मल्हारला पाहिले विवस्त्र, मग जे झालं...पाहा VIDEO

Jeev Maza Guntla : अंतराने मल्हारला पाहिले विवस्त्र, मग जे झालं...पाहा VIDEO

सध्या ‘जीव माझा गुंतला’ मालिकेत एक असा सीन चित्रीत करण्यात आला आहे ज्यामुळे येणाऱ्या भागांमध्ये अंतर आणि मल्हार यांच्यामध्ये रोमँटिक नाते निर्माण होताना दिसणार का अशी प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

  मुंबई. 09 ऑक्टोबर : कलर्स मराठी वाहिनीवर ‘जीव माझा गुंतला’ (Jeev Maza Guntla ) ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. या मालिकेमध्ये अंतरा आणि मल्हार यांची कहाणी दाखवण्यात आलेली आहे. हिंदी मालिका प्रमाणे मराठी मालिकांमध्ये  (Jeev Maza Guntla Latest Update )  देखील काही बोल्ड सीन चित्रीत करण्यात येत आहेत. बदलत्या काळानुसार यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. सध्या मालिकेत एक असा सीन चित्रीत करण्यात आला आहे ज्यामुळे येणाऱ्या भागांमध्ये अंतर आणि मल्हार (antara and malhar)  यांच्यामध्ये रोमँटिक नाते निर्माण होताना दिसणार का अशी प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. मालिकेच्या नवीन प्रमोमध्ये दाखवण्यात आले आहे की, मल्हार हा बेडरूममध्ये असलेल्या बाथरूममध्ये स्नान करत असतो. स्नान करताना अंतरा अचानक बेडरूममध्ये येते. त्याचवेळी मल्हार अचानक बाथरूममधून बाहेर येतो त्यावेळी त्याच्या अंगावर कपडे नसतात. हे सगळं अंतरा पाहते व डोळे बंद करते. हा वेगळा सीन सध्या या मालिकेत चित्रीत करण्यात आला आहे. त्यामुळे मालिका चर्चेत आली आहे. त्यामुळे येणाऱ्या भागांमध्ये आता अंतर आणि मल्हार यांच्यामध्ये रोमँटिक नाते निर्माण होताना दिसणार का याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
  या  मालिकेने फार थोड्या कालावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेतील कलाकार आणि कथानक यांनी प्रेक्षकांच्या मनावर घट्ट पकड निर्माण केली आहे. सध्या मालिकेत दाखवण्यात येत असल्याप्रमाणे, अंतरा आणि मल्हार यांचं लग्न झालं आहे. परंतु, मल्हार अंतराला त्याच्या पत्नीचं स्थान देण्यास तयार नाही असे दिसून येत आहे. वाचा :Navratri 2021: तिसऱ्या दिवशी जया गौरी दुर्गा परमेश्वरी रुपात सजली ही अभिनेत्री; पाहा ओळखू येतेय का मनाविरुद्ध लग्न झाल्याने अंतरा आणि मल्हार यांच्यात वारंवार खटके उडताना पाहायला मिळत आहेत. परंतु, घरच्यांच्या इच्छेखातर अंतरादेखील मल्हारचा रोष सहन करत तिथे राहत आहे. मात्र सध्या मालिकेचे कथानक पाहता या दोघांच्यात कधी प्रेम निर्माण होईल का तसेच मल्हारला अंतराचा प्रामाणिकपणा कधी समजेल का, याची उत्सकता सध्या प्रेक्षकांना लागली आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, TV serials

  पुढील बातम्या