मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'झिम्यानं रंगल आंगण बाई खेळाया मिळालं रिंगण'; 'जीव माझा गुंतला' मालिकेत रंगणार मंगळागौरचा खेळ

'झिम्यानं रंगल आंगण बाई खेळाया मिळालं रिंगण'; 'जीव माझा गुंतला' मालिकेत रंगणार मंगळागौरचा खेळ

कलर्स मराठीवरील 'जीव माझा गुंतला' या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेच्या आगामी भागातील एक झलक अंतरानं म्हणजेच अभिनेत्री योगिता चव्हाणनं शेअर केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 27 ऑगस्ट : कलर्स मराठीवरील 'जीव माझा गुंतला' या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेतील अंतरा आणि मल्हारच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं असून दोघांनाही चाहत्यांकडून भरभरुन प्रेम मिळत असतं. या मालिकेत अनेक नवनवीन वळणं आलेली पहायला मिळाली. अशातच आता या मालिकेत मंगळागौर सण साजरा होणार आहे. त्यामुळे या विशेष भागाचे अनेक BTS व्हिडीओ समोर येत आहेत.

'जीव माझा गुंतला' या मालिकेच्या आगामी भागातील एक झलक अंतरानं म्हणजेच अभिनेत्री योगिता चव्हाणनं शेअर केली आहे. तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये मंगळागौरचा खेळ रंगल्याचं दिसत आहे. यामध्ये सगळ्यांनी पारंपारिक पोशाख परिधान केला असून मराठमोळा साज शृंगार केला आहे. सगळेच खूप सुंदर दिसत असून या व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. अंतरानं या व्हिडीओला छानसं गाणं टाकत सुंदर असं कॅप्शनही दिलं आहे. मंगळागवर बाई मंगळागवर ... माज्या सासरला आली माजी गवर', असं म्हणत अंतरानं हा व्हिडीओ शेअर केलाय.

मराठी मालिकांमध्येही या सणाचं खूप महत्त्व दाखवलं जातं. अनेक निरनिराळे खेळ यानिमित्तानं घेतले जातात. अशातच हा खेळ आता 'जीव माझा गुंतला' या मालिकेमध्ये पहायला मिळणार आहे. प्रेक्षक या भागासाठी खूप उत्सुक आहेत. व्हिडीओवर अनेक कमेंट येत आहेत. 'भारी, खूप सुंदर, छान दिसत आहात सगळे', अशा अनेक कमेंट चाहते करताना दिसतायेत.

हेही वाचा -  Bus Bai Bus: खड्डेमुक्त मुंबई शक्य आहे का?; पाहा काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर

दरम्यान, रिक्षावाली अंतरा आणि बीझनेस मॅन मल्हार यांची आगळीवेगळी गोष्ट 'जीव माझा गुंतला' मालिकेतून प्रेक्षकांना पसंतीस उतरत आहे. मल्हार आणि अंतरा लग्नबंधनात अडकल्यापासून मालिकेला एक वेगळीच कलाटणी मिळाली आहे. अशातच दोघांमध्ये दुरावा आणण्यासाठी आणखी एका नव्य पात्राची एण्ट्री मालिकेत झाली आहे. त्यामुळे मालिकेत आणखी काय वेगळं पहायला मिळणार यासाठी चाहते उत्सुक आहेत.

First published:

Tags: Colors marathi, Marathi entertainment, Tv serial