Home /News /entertainment /

पुष्पा सेनामातील अल्लू अर्जुनच्या स्टाईलची कॉपी करणं अंतरा-मल्हारला पडलं महागात, Video Viral

पुष्पा सेनामातील अल्लू अर्जुनच्या स्टाईलची कॉपी करणं अंतरा-मल्हारला पडलं महागात, Video Viral

'जीव माझा गुंतला' (jeev majha guntala ) मालिकेतील अंतरा- मल्हारने पुष्पा चित्रपटातील एका गाण्यावर (Teri Jalak Asharfi Srivalli ) धमाल रील केलं आहे. ही रील सोशल मीडियावर सध्या व्हयरल होत आहे.

  मुंबई, 11 जानेवारी - छोट्या पडद्यावर 'जीव माझा गुंतला' (jeev majha guntala ) मालिकेने सुरू होताच संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले. परस्परविरोधी असे मल्हार आणि अंतरा लग्नबंधनात अडकल्यावर त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली. अंतरा आणि मल्हारची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. आता या दोघांनी पुष्पा चित्रपटातील एका गाण्यावर (Teri Jalak Asharfi Srivalli ) धमाल रील केलं आहे. ही रील सोशल मीडियावर सध्या व्हयरल होत आहे. अंतराची भूमिका या मालिकेत योगिता चव्हाण साकारत आहे. योगिताला डान्सची आवड आहे. शिवाय ती नेहमी ट्रेडिंग गाण्यावर रील करत असते. आता देखील तिनं मल्हारसोबच अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटातील 'तेरी झलक अशरफी श्रीवल्ली...नैना मदक बर्फी' या गाण्यावर डान्स केला आहे. हा व्हिडिओ काहीसा फनी आहे. या व्हिडिओमध्ये अंतरा म्हणजे योगिता चव्हाण अल्लू अर्जुनची स्टाईल करताना दिसत आहे. विशेष म्हणजे तिच्यासोबच मल्हार देखील तिला फॉलो करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.मात्र त्यांचा हा प्रयत्न मध्येच फसतो. नंतर मल्हार हातात एक चपल घेतो व चालायला लागतो. अल्लू अर्जुनला फॉलो करणं त्यांना जमलं नसलं तरी त्यांचा हा फनी अंदाज देखील नेटकऱ्यांना आवडला आहे. तसं पाहता या तिघांनीही कॉपी करण्याचा चांगला प्रयत्न केलाय मात्र त्यांना तोच आवडलेला नाही. कारण योगिताने हा फनी व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, उत्तम दर्ज्याचा फालतूपणा... या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव होत आहे.
  पुष्पा चित्रपटातील अल्लू अर्जुनचे डायलॉग आणि समंथा प्रभूचा डान्स चांगलाच गाजला आहे. अशातच रश्मिकावर चित्रित केलेलं सामी सामी हे देखील गाणं खूप चर्चेत आहे. यासोबत तेरी झलक अशरफी श्रीवल्ली...हे गाण देखीर प्रेक्षकांना खूप भावले आहे. या सिनमातील गाण्यावर प्रत्येकजण रील बनवताना दिसत आहे. कॉमन मॅन ते सेलेब्स सर्वजण या सिनेमातील गाण्याच्या व सिनेमाच्या प्रेमात आहेत व कौतुक करत आहेत. वाचा-संगीत नाटकांपासून ते मालिकांपर्यंत 70 वर्ष अभिनय करणाऱ्या 'आजी काळाच्या पडद्याआड मालिकेत आता एक नवीन ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. अंतराला पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे अंतराची मल्हार मदत करणार का..असा प्रश्न पडला आहे. अंतराने कसालही गुन्हा केलेला नाही मात्र मल्हार यावर विश्वास ठेवून तिला पोलिसांच्या तावडीतून सोडवेल का हे येणाऱ्या भागातच समजणार आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Colors marathi, Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या