मुंबई, 16 नोव्हेंबर- छोट्या पडद्यावरील 'जीव माझा गुंतला' (Jiv Maza Guntala) या मालिकेत आता एक रंजक वळण बघायला मिळणार आहे. मल्हारच्या कारखान्यात कामगार म्हणून काम करणारी त्याची पत्नी अंतरा आता मल्हार समोर एक सत्य आणणार आहे. यासाठी तिनं एक जबगदस्त प्लॅन केला आहे. यासाठी तिनं मल्हराचा लुक बदलून त्याला कारखान्यात घेऊन गेली आहे. या लुकमध्ये मल्हारला ओळखनं मुश्किल झालं आहे. सध्या मल्हारचा (Malhar) हा लुक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. काहींना असा प्रश्न देखील पडला आहे की त्याची अवस्था कशामुळं अशी झाली आहे.
मल्हारने म्हणजे सौरभ चौगुलेनं (Saorabh Chaugule) वेषांतर केलं आहे. डोक्याला लाल रंगाचा टॉवेल तर डोळ्या काळा चष्म चढवला आहे. यासोबतच दोन खोटे दात देखील लावले आहेत. तसेच दाढीचे केस देखील पांढरे केले आहेत. कारखान्यात काम करणारा त्यांचा मॅनेजर कशाप्रकारे कामगारांची पिळवणूक करतोय हे समोर आणण्यासाठी अंतरानं हा सगळा सापळा रचला आहे.
वाचा : 'मला जमिनीवर उतरवणारी..'असं म्हणत समीर चौगुलेंची पत्नीसाठी खास पोस्ट
अंतराचा हा प्लॅन यशस्वी होणार की मल्हारचा चेहरा समोर येणार हा देखील प्रश्न सर्वांना पडला आहे. मात्र अंतराचा हा प्लॅन यशस्वी झाला तर कामगाराची होणारी पिळवणूक थांबण्यास मदत होईल. यासोबत अंतरावर मल्हारचा विश्वास निर्माण होईल व या दोघांचं नातं अधिक घट्ट होण्यास मदत होईल.
View this post on Instagram
'जीव माझा गुंतला' या मालिकेमुळे मुख्य अभिनेत्याच्या रूपात घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे सौरभ चौगुले होय. मालिकेतील हँडसम, रागीट पण मनातून तितकाच हळवा मल्हारने चाहत्यांना भुरळ घातली आहे.मात्र फारच कमी लोकांना हे माहिती आहे, की हा आपला लाडका कलाकार फक्त अभिनेताच नव्हे तर एक उच्चशिक्षित अभिनेता आहे. सौरभने इंजिनियरिंग केलं आहे. वाटलं ना आश्चर्य? हो हे खरं आहे. या अभिनेत्याने इंजिनियरिंगची पदवी घेऊनही फक्त आवड असल्याने अभिनयाकडे आपला मोर्चा वळवला आहे. मात्र हे यश त्याला सहजासहजी मिळालेलं नाहीय. त्यासाठी त्याने अनेक अडचणी पार केल्या आहेत. अनेक कष्ट त्याने घेतले आहेत. अभिनेत्याने रंगमंचापासून अभिनयाला सुरुवात केली होती. आणि आज तो एका मुख्य अभिनेत्याच्या रूपात पडद्यावर झळकत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.