Jayeshbhai Jordaar : नव्या सिनेमातील रणवीर सिंहचा हटके लुक रिलीज

Jayeshbhai Jordaar : नव्या सिनेमातील रणवीर सिंहचा हटके लुक रिलीज

‘जयेशभाई जोरदार’ सिनेमाचा फर्स्ट लुक रिलीज झाला असून यात रणवीर सिंह एका गुजराती तरुणाच्या अवतारात दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 04 डिसेंबर : अभिनेता रणवीर सिंहचं करिअर सध्या खूपच जोरावर आहे. त्याचे एकामागोमाग एक सिनेमा रिलीज होत आहेत आणि ते सुपरहीटही होत आहेत. मागच्या काही काळापासून रणवीरच्या ‘83’ या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. याशिवाय लवकरच तो ‘जयेशभाई जोरदार’ या सिनेमात दिसणार आहे. नुकताच या सिनेमाचा फर्स्ट लुक रिलीज झाला असून यात रणवीर सिंह एका गुजराती तरुणाच्या अवतारात दिसत आहे. त्याचा हा लुक सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

जयेशभाई जोरदारच्या फर्स्ट लुकमध्ये रणवीर सिंह पोलका डॉट्स ऑरेंज कलरचं टिशर्ट आणि फेडेड पॅन्टमध्ये स्मार्ट दिसत आहे. याशिवाय या पोस्टरमध्ये रणवीरच्या मागे खूप साऱ्या बायका डोक्यावरून चेहऱ्यापर्यंत पदर घेऊन उभ्या असलेल्या दिसत आहेत.

सलमानच्या ‘राधे’समाेरील अडचणी वाढल्या, अभिनेत्याला झाली दुखापत

 

View this post on Instagram

 

JAYESHBHAI hain ekdum JORDAAR! #JayeshbhaiJordaar #ManeeshSharma #DivyangThakkar @yrf

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

कशी आहे या सिनेमातील रणवीरची भूमिका

पिंकव्हिलानं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार ‘जयेशभाई जोरदार’मधील भूमिकेबद्दल बोलताना रणवीर म्हणला, ‘जसं चार्ली चॅपलिननं एकदा म्हटलं होतं, जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला हसवायचं असेल तर दुःख पचवण्याची क्षमता तुमच्यात असायला हवी आणि त्याच्याशी तुम्हाला खेळता आलं पाहिजे. जयेशभाई एक सामान्य व्यक्ती जो एका प्रतिकूल परिस्थितीत काहीतरी वेगळं काम करत असताना संपून जातो. तो संवेदनशील आणि दयाळू आहे. तो पुरुषप्रधान संस्कृतीमध्येही पुरुष आणि महिलांना समान अधिकार मिळावेत यावर विश्वास ठेवणारा आहे.’

या सिनेमाचं दिग्दर्शन दिव्यांग ठाकूरनं केलं आहे. तर यशराज स्टुडिओनं या सिनेमाची निर्मिती केली आहे.

सिनेमांच्या बीझी शेड्युलमध्ये फिटनेस जपण्यासाठी काय करते कतरिना कैफ

हे आहेत रणवीरचे अपकमिंग सिनेमा

रणवीरच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर तो लवकरच 83 या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन कबीर सिंहनं केलं असून यात रणवीर सिंह भारताचे माजी क्रिकेटर कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा सिनेमा भारतीय क्रिकेट टीमनं विश्वचषक 1983 मध्ये मिळवलेल्या ऐतिहासिक विजयावर आधारित आहे. या सिनेमात रणवीरसोबत दीपिका पदुकोणसुद्धा स्क्रीन शेअर करणार आहे. ती कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारत आहे.

Tanhaji सिनेमातील पहिलं गाणं रिलीज, अजय देवगणचा हटके अंदाज

Published by: Megha Jethe
First published: December 4, 2019, 12:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading