...आणि जयंत पाटलांनी शाहरुख खानला 'आग्री' हिसका दाखवला

शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी सिने अभिनेता शाहरूख खानला चांगलंच खडसावल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. शाहरूख खान त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी अलिबागच्या फार्महाऊसवर गेला होता. रात्रभर पार्टी साजरी करून सकाळी परत मुंबईला परत खासगी स्पीड बोटीने आला.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Nov 11, 2017 05:01 PM IST

...आणि जयंत पाटलांनी शाहरुख खानला 'आग्री' हिसका दाखवला

मुंबई, 11 नोव्हेंबर : शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी सिने अभिनेता शाहरूख खानला चांगलंच खडसावल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. शाहरूख खान त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी अलिबागच्या फार्महाऊसवर गेला होता. रात्रभर पार्टी साजरी करून सकाळी परत मुंबईला परत खासगी स्पीड बोटीने आला.

त्यावेळी 'गेट वे ऑफ इंडिया'च्या शेजारील जेट्टीला पोहचल्यावर शाहरूख खान लगेच जेट्टीवर न उतरता अर्धा तास बोटीत बसून सिगरेट पीत राहीला. त्यामुळे जेट्टीबाहेर बघ्यांची गर्दी वाढली. बघता बघता गर्दी एवढी वाढली की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नं निर्माण झाला. त्याचवेळी शेकापचे आमदार जयंत पाटील त्याच जेट्टीवरून अलिबागला जाण्यासाठी पोहचले. पण बघ्यांच्या गर्दीमुळे पोलिसांनी त्यांच्यासह लोकांनाही मागे रेटले. या धक्काबूकीमुळे संतप्त झालेल्या जयंत पाटलांनी तिथल्या तिथेच शाहरुखला आपला आग्री हिसका दाखवला.

जयंत पाटील यांनी त्यांच्या बोटीत बसण्यापूर्वी शाहरूखला चांगलेच सुनावले. तू हिरो असलास म्हणून काय झालं... सगळ्यांना विकत घेतलंय का...? अलिबाग विकत घेतलंय का...? अलिबागमध्ये माझ्या परवानगी शिवाय तू येऊ शकणार नाही... असं ठणकावल्या नंतर, शाहरूख त्याच्या बोटीतून बाहेर पडला आणि जेट्टी बाहेर येईन कारमध्ये बसला. तो पर्यंत जेट्टी बाहेरील बघ्यांची चांगलीच करमणुक झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 11, 2017 10:18 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...