प्रतीक्षा संपली! 'जयललिता' कंगनाच्या थलायवी सिनेमात हा आहे MGR च्या भूमिकेत
कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) थलायवी (Thalaivi) या चित्रपटात एमजीआर यांची भूमिका कोण साकारणार हा प्रश्न अनेकांना पडला होता.आता त्याचं उत्तर मिळालं आहे.
मुंबई, 24 डिसेंबर: कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) थलायवी (Thalaivi) चित्रपटाचं शूटिंग काही दिवसांपूर्वीच पूर्ण झालं आहे. या चित्रपटात कंगना रणौत जयललिता यांची भूमिका करत आहे. पण जयललिता यांच्या आयुष्यात एमजीआर (MGR) अर्थात मारुदुर गोपालन रामचन्द्रन यांचा सहभाग प्रत्येक वळणावर अतिशय महत्वाचा होता. जयललिता यांच्या आयुष्यातील अनेक वळणांवर त्यांना एमजीआर यांची साथ मिळाली होती. त्यामुळे थलायवी चित्रपटात MGR यांची भूमिका कोण करणार? असा प्रश्न चाहत्यांना होता.
एमजीआर यांच्या भूमिकेबद्दल आता प्रतीक्षा संपली आहे. एमजीआर यांच्या पुण्यतिथीनिमित्त थलायवीच्या टीमने त्यांची भूमिका कोण साकारत आहे याचं उत्तर दिलं आहे. या फिल्ममध्ये अरविंद स्वामी MGR यांची भूमिका साकारत आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने अरविंद स्वामी बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहेत. या आधी त्यांनी रोजा आणि बॉम्बे या बॉलिवूडपटात काम केलं होतं. अरविंद स्वामी एमजीआर यांच्या भूमिकेसाठी अतिशय योग्य असल्याचं निर्मात्यांचं मत आहे.
कंगना रणौतने थलायवी या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. कंगनाने या सिनेमासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. जयललिता यांच्यासारखं दिसण्यासाठी तिने आधी 17 किलो वजन वाढवलं. त्यानंतर गाण्यांचं शूटिंग करण्यासाठी 15 किलो वजन कमी केलं.