मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /करिअरच्या शिखरावर विवाहित निर्मात्याशी प्रेम, लग्न केलं मात्र बायको होऊ शकली नाही; अजूनही एकटी राहते ही अभिनेत्री

करिअरच्या शिखरावर विवाहित निर्मात्याशी प्रेम, लग्न केलं मात्र बायको होऊ शकली नाही; अजूनही एकटी राहते ही अभिनेत्री

जया प्रदा

जया प्रदा

एके काळी बॉलिवूडवर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे जया प्रदा. त्यांनी चित्रपटांमध्ये खूप प्रसिद्धी मिळवली, नंतर राजकारणात देखील हात आजमावला. चित्रपट आणि राजकारणात यशस्वी ठरलेल्या जयाचे वैयक्तिक आयुष्य मात्र कायम चर्चेत राहिलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 06 फेब्रुवारी: मनोरंजन सृष्टीत असे अनेक कलाकार आहेत जे आपल्या चित्रपटांपेक्षा खाजगी आयुष्यात जास्त चर्चेत राहतात. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची अधिक चर्चा होताना दिसून येते. असंच एक नाव म्हणजे एके काळी बॉलिवूडवर राज्य करणारी अभिनेत्री जया प्रदा. जया प्रदा यांचं खरं नाव आहे ललिता राणी. तेलगू चित्रपट फायनान्सरची मुलगी ललिता राणीने लहानपणापासूनच नृत्य-संगीताचे धडे घेतले. वयाच्या 12 व्या वर्षापासून चित्रपटात काम करायला सुरुवात केली. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. चित्रपटांमध्ये खूप प्रसिद्धी मिळवली, नंतर राजकारणात हात आजमावला. चित्रपट आणि राजकारणात यशस्वी ठरलेल्या जयाचे वैयक्तिक आयुष्य मात्र कायम चर्चेत राहिलं. जयाचं लग्न झालं तेव्हा ती खूप चर्चेत होती.

तेलुगू चित्रपटातून करिअरची सुरुवात करणाऱ्या जया प्रदा यांना हिंदी चित्रपटसृष्टीत खरी ओळख मिळाली. दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शक के. विश्वनाथने जयासोबत तेलुगू चित्रपट 'सिरी सिरी मुव्वा' हा सिनेमा हिंदीत 'सरगम' य नावाने बनवला. हा चित्रपट प्रचंड हिट झाला आणि जया रातोरात स्टार बनली. या चित्रपटापर्यंत जया यांना हिंदी बोलण्यात खूप अडचण येत होती. पण तीन वर्षांनंतर विश्वनाथने पुन्हा जयाला 'कामचोर' चित्रपटात कास्ट केले, तोपर्यंत ती अस्खलित हिंदी बोलू लागली होती.

हेही वाचा - Imran Khan: बॉलिवूडपासून दूर, पत्नीपासून विभक्त आमिरचा भाचा इम्रान खान पडलाय 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात?

यानंतर ती 'शराबी', 'संजोग' सारख्या दमदार चित्रपटांमध्ये झळकली, पण 1984 मध्ये आलेल्या 'तोहफा' नंतर जयाला विशेष ओळख मिळाली. याच वेळी ही प्रतिभावान आणि सुंदर अभिनेत्री प्रसिद्ध चित्रपट निर्माते श्रीकांत नाहटा यांच्या प्रेमात पडली. जेव्हा हे प्रकरण चर्चेत आले तेव्हा श्रीकांतने 1986 मध्ये जयाशी लग्न केले. या लग्नानंतर बराच वाद निर्माण झाला होता.

श्रीकांतने पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता जयाशी लग्न केले. खरेतर श्रीकांत नाहटा यांचे पहिले लग्न चंद्रासोबत झाले होते, त्यामुळे त्यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता जया प्रदा यांच्याशी लग्न केले. साहजिकच गदारोळ होणारच होता. एवढेच नाही तर श्रीकांत आणि चंद्रा हे तीन मुलांचे वडीलही होते. त्यांनी जयाशी लग्न केले पण त्यांना मूलबाळ झाले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जयाला आई व्हायचं होतं पण श्रीकांत यासाठी तयार नव्हता. जयाप्रदा यांनी श्रीकांतशी लग्न तर केले पण त्यांना पत्नीचा दर्जा कधीच मिळू शकला नाही.

2 फेब्रुवारी 2023 रोजी जयाप्रदा यांचे गुरु के. विश्वनाथ यांचे निधन झाले. त्यांनीच जयाप्रदा यांची बॉलिवूडमध्ये ओळख करून दिली होती. आपल्या गुरूंना श्रद्धांजली वाहताना जया यांनी थ्रोबॅक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. के. विश्वनाथ हे दक्षिण आणि बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक होते. जयाप्रदा त्यांच्या बहुतेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये दिसल्या होत्या.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News, Entertainment