बिग बी का आजारी पडले? जया बच्चन यांनी सांगितलं खरं कारण

बिग बी का आजारी पडले? जया बच्चन यांनी सांगितलं खरं कारण

काल बिग बी जोधपूरला 'ठग्ज आॅफ हिंदोस्तान'चं शूटिंग करताना आजारी पडले. पण ते का आजारी पडले याचं खरं कारण त्यांची पत्नी जया बच्चन यांनी सांगितलं.

  • Share this:

14 मार्च : काल अख्ख्या देशाला एकच चिंता सतावत होती. ती म्हणजे महानायक अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीची. काल बिग बी जोधपूरला 'ठग्ज आॅफ हिंदोस्तान'चं शूटिंग करताना आजारी पडले. पण ते का आजारी पडले याचं खरं कारण त्यांची पत्नी जया बच्चन यांनी सांगितलं.

त्या म्हणाल्या, ' ठग्ज आॅफ हिंदोस्तान सिनेमासाठीचा काॅस्च्युम प्रचंड जड आहे. त्याचं वजन खांदा, पाठ आणि मानेवर पडतं. त्याचा त्रास त्यांना झाला. शिवाय वाढत्या उन्हामुळेही त्यांच्या तब्येतीवर परिणाम झालाय.'

बिग बींची तब्येत बिघडल्यावर मुंबईहून डाॅक्टर्सची टीम जोधपूरला गेली. त्यांना तपासलं आणि आराम करण्याचा सल्ला दिला. बिग बी जोधपूरलाच शूटिंग करतायत.

First published: March 14, 2018, 11:40 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading