जया बच्चन देशाच्या सर्वात श्रीमंत खासदार; वापरतात 9 लाखांचा पेन!

जया बच्चन देशाच्या सर्वात श्रीमंत खासदार; वापरतात 9 लाखांचा पेन!

समाजवादी पक्षाच्या राज्यसभेतील उमेदवार जया बच्चन देशातील सर्वात श्रीमंत खासदार बनू शकतात. कारण राज्यभेच्या उमेदवारी अर्जामध्ये त्यांनी 1 हजार कोटी संपत्तीचा उल्लेख केला आहे.

  • Share this:

13 मार्च : समाजवादी पक्षाच्या राज्यसभेतील उमेदवार जया बच्चन देशातील सर्वात श्रीमंत खासदार बनू शकतात. कारण राज्यभेच्या उमेदवारी अर्जामध्ये त्यांनी 1 हजार कोटी संपत्तीचा उल्लेख केला आहे. त्यामुळे जर त्या राज्यसभेत खासदार म्हणून निवडून आल्या तर त्या सगळ्यात श्रीमंत उमेदवार ठरतील.

2014च्या सुरुवातीला भाजपाचे राज्यसभेचे खासदार रवींद्र किशोर यांनी 800 कोटींच्या मालमत्तेची घोषणा करून सर्वात श्रीमंत खासदार बनण्याचा मान मिळवला होता. त्यात आता जया बच्चन यांनीही उडी मारली आहे.

जया बच्चन यांनी नुकताच राज्यसभेत उमेदवारीसाठी अर्ज भरला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार त्यात त्यांनी 2012ला 493 कोटीच्या मालमत्तेची घोषणा केली होती. आणि आताच्या उमेदवारी अर्जात त्यांनी 1 हजार कोटी मालमत्तेची घोषणा केली आहे.

शपथपत्रानुसार, अमिताभ दांपत्याने 62 कोटींच्या सोने आणि दागिन्यांचा तपशील दिला आहे. अमिताभ बच्चन यांच्या हिस्स्यामध्ये 36 कोटी इतके दागिने दाखवण्यात आले आहेत. तर यात त्यांच्या 13 कोटींच्या 12 गाड्यांचाही उल्लेख करण्यात आला आहे.

त्यात रॉल्स रॉयस, 3 मर्सीडीज, 1 पोर्शे, 1 रेंज रोव्हर, 1 टाटा नॅनो कार आणि 1 ट्रक्टर या महागड्या गाड्यांचा समावेश आहे.

अमिताभ बच्चन आणि जया बच्चनकडे 3.4 कोटी आणि 51 लाखांची घड्याळं आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडे 9 लाखांचा एक पेन आहे. बच्चन कुटुंबाचा फ्रांसला ब्रिग्नोगन प्लेजमध्ये 3,175 स्क्वेअर मीटर असा एक प्लॉट आहे. नॉयडा, भोपाळ, पुणे, अहमदाबाद आणि गांधीनगर इथेसुद्धा त्यांची संपत्ती आहे.

जया बच्चनकडे लखनौच्या काकोरीमध्ये 1.22 हेक्टर शेतजमीन आहे. त्याची किंमत सुमारे 2.2 कोटी एवढी आहे. बाराबंकीमध्ये दौलतपूरजवळ अमिताभ बच्चनची 3 एकर जमीन आहे. त्याची किंमत सुमारे 5.7 कोटी इतकी आहे.

 

First published: March 13, 2018, 12:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading