मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Jaya Bachchan birthday: अमिताभ नाही तर धर्मेंद्र यांच्यावर होतं प्रेम, Sholay मधील 'राधा'चा खास किस्सा

Jaya Bachchan birthday: अमिताभ नाही तर धर्मेंद्र यांच्यावर होतं प्रेम, Sholay मधील 'राधा'चा खास किस्सा

Happy Birthday Jaya Bachchan: जया बच्चन आणि धर्मेंद्र (Jaya Bachchan and Dharmendra Movies) यांनी गुड्डी, समाधी, शोले, चुपके चुपके, जानी दोस्त असे अनेक चित्रपट एकत्र केले आहेत.

Happy Birthday Jaya Bachchan: जया बच्चन आणि धर्मेंद्र (Jaya Bachchan and Dharmendra Movies) यांनी गुड्डी, समाधी, शोले, चुपके चुपके, जानी दोस्त असे अनेक चित्रपट एकत्र केले आहेत.

Happy Birthday Jaya Bachchan: जया बच्चन आणि धर्मेंद्र (Jaya Bachchan and Dharmendra Movies) यांनी गुड्डी, समाधी, शोले, चुपके चुपके, जानी दोस्त असे अनेक चित्रपट एकत्र केले आहेत.

मुंबई, 09 एप्रिल: बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan 74th Birthday) आज 74 वा वाढदिवस साजरा करत आहेत. आजपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये अभिनेत्रीने अनेक दर्जेदार आणि सुपरहिट चित्रपट केले आहे. जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांची (Jaya Bachchan and Amitabh Bachchan) प्रेमकहाणी देखील नेहमी चर्चेत राहिली. पण तुम्हाला माहित आहे जया बच्चन यांना कोण आवडायचं? तर याचं उत्तर आहे- 'धर्मेंद्र'. 'कॉफी विद करण' या शोमध्ये स्वत: जया बच्चन यांनी याबाबत खुलासा केला होता.

जया बच्चन आणि धर्मेंद्र (Jaya Bachchan and Dharmendra Movies) यांनी गुड्डी, समाधी, शोले, चुपके चुपके, जानी दोस्त असे अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. शोलेमधील (Sholay) या कलाकारांच्या भूमिकेने त्यांना विशेष लोकप्रियता दिली. शोले सिनेमात जया आणि धर्मेंद्र दोघे एकमेकांचा लव्ह इंटरेस्ट म्हणून भूमिका करत नव्हते. जया बच्चन यांनी या सिनेमात 'राधा'ची भूमिका केली होती, तर धर्मेंद्र यांनी 'विरू'ची.  पण जया यांना हेमा मालिनी यांनी साकारलेली 'बसंती' करायची होती, यामागचं एकमेव कारण म्हणजे त्यांना धर्मेंद्र आवडत (Jaya Bachchan loved Dharmendra) होते. 'कॉफी विद करण' या करण जोहरच्या टॉक शो (Jaya Bachchan and Hema Malini in Koffee with Karan) मध्ये हेमा मालिनी आणि जया बच्चन यांनी सहभाग घेतला होता, तेव्हा जया यांनी स्वत:च याबाबत खुलासा केला होता.

हे वाचा-माधुरी दीक्षितच्या पतीने खरेदी केली नवी कार, फक्त किंमतच नव्हे तर फिचर्ससुद्धा आहेत जबरदस्त

जया बच्चन यावेळी करणला म्हणाल्या होत्या की, 'मी बसंतीची भूमिका करायला हवी होती! कारण माझे धर्मेंद्रवर प्रेम होते. जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा पाहिलं आणि माझी त्यांच्याशी ओळख करुन देण्यात आली... तेव्हा त्याठिकाणी असाच एक सोफा होता... मी जाऊन त्याच्या मागे लपले होते. मी खूप घाबरले होते! मला काय करावं कळत नव्हतं. तिथे हा विलक्षण दिसणारा माणूस होता. मला अजूनही आठवतं की त्यांनी काय परिधान केलं होतं – त्यांनी सफेद ट्राउजर आणि सफेद शर्ट. त्यावेळी ते एखाद्या 'ग्रीक गॉड'सारखे दिसत होते.'

रंजक बाब म्हणजे, जया बच्चन आणि धर्मेंद्र यांनी 'गुड्डी' नावाचा सिनेमा एकत्र केला आहे. यामध्ये जया बच्चन यांची भूमिका एका युवतीची होती, जिचा धर्मेंद्र यांच्यावर क्रश होता.

हे वाचा-Taapasee Pannu ला बनायचं आहे 'मॅडम फायनान्स मिनिस्टर', काय आहे अभिनेत्रीची 'मन की बात'?

दरम्यान जया बच्चन आणि धर्मेंद्र आता करण जोहरच्या अपकमिंग सिनेमात एकत्र दिसणार आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Raani Ki Prem Kahani) या चित्रपटात हे दिग्गज कलाकार एकत्र दिसरणार आहेत. या सिनेमात शबाना आझमी, आलिया भट्ट, रणवीर सिंह अशी स्टारकास्ट असणार आहे. एका अर्थाने हा सिनेमा जया यांच्यासाठी कमबॅक असेल. त्यांनी शेवटचे 2008 मध्ये द्रोणा या चित्रपटात काम केले होते, त्यानंतर 2016 मध्ये Ki & Ka सिनेमात त्यांनी आणि अमिताभ बच्चन यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा सिनेमा 10 फेब्रुवारी 2023 रोजी प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे.

First published:
top videos