S M L

पूजा सोडून सेल्फी घेणाऱ्या भटजीवर जया बच्चन रागावल्या

भटजी जया बच्चनना बघताच पूजा सोडून त्यांच्याबरोबर सेल्फी घ्यायला सरसावला. तेव्हा जया एकदम भडकल्या. म्हणाल्या, 'आप पूजा मे ध्यान देना'.

Sonali Deshpande | Updated On: Aug 28, 2017 04:44 PM IST

पूजा सोडून सेल्फी घेणाऱ्या भटजीवर जया बच्चन रागावल्या

28 आॅगस्ट : ईशा देओलच्या डोहाळे जेवणाच्या वेळी जया बच्चन चर्चेत राहिल्या. त्याचं झालं असं की, ईशाच्या या कार्यक्रमात पूजाविधी सुरू होते. तो करणारा भटजी जया बच्चनना बघताच पूजा सोडून त्यांच्याबरोबर सेल्फी घ्यायला सरसावला. तेव्हा जया एकदम भडकल्या. म्हणाल्या, 'आप पूजा मे ध्यान देना'. तसा एकच हशा उमटला.

डोहाळे जेवणाच्या वेळी ईशानं आपल्या नवऱ्याशी पुन्हा साग्रसंगीत लग्न केलं. तेव्हा बाॅलिवूडचे बरेच जण हजर होते. ईशाचं लग्न लावणारा भटजी तामिळ होता. त्यामुळे तो काय मंत्रोच्चार करतोय, हेच कळलं नव्हतं. त्यामुळे आता हिंदी भाषिक भटजीकडून तिनं पुन्हा लग्न लावून घेतलं.

अर्थात, या सोहळ्यात ईशा बाजूलाच राहिली. आणि टाॅक आॅफ द टाऊन झाल्या जया बच्चन.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 28, 2017 04:44 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close